- वसंत भोईरवाडा : तालुक्यातील ऐनशेत गावातील जि.प. शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे शिकवता शिकवता स्वत:ही अध्ययन करणाऱ्या इस्त्रायली विद्यार्थ्यांचे गुरुवारी त्यांच्याच देशाकडून खास कौतुक झाले. येथे दोन आठवडे मेहनत करणाºयां या चमूची पाठ थोपटण्यासाठी इस्त्रायलचे मुंबईतील महावाणिज्यदूत याकोव फिंकलश्टाईन येथे आले होते.इस्रायलच्या व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थी व एल आल या इस्रायली विमान कंपनीचे कर्मचारी येथे तळ ठोकून आहेत. फिंकलश्टाईन यांच्या सोबत दूतावासातील कॉन्सूल गलीत लारोश फलाह आणि राजकीय संबंध तसेच विशेष प्रकल्प अधिकारी अनय जोगळेकर हे यावेळी उपस्थित होते. या अधिकाºयांनी स्थनिक ग्रामस्थांशी संवाद साधला. इस्रायली विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने दोन आठवडे येथील ग्रामीण भागातील शाळांची दुरु स्ती, रंगरंगोटी, खेळणी उभारणे यासह शिकवण्याचे काम केले. या परदेशी पाहुण्यांच्या उत्स्फूर्तपणे काम करण्याच्या शैलीने गावकरी भारावून गेले होते.फिंकलश्टाईन यांनी इस्त्रायली विद्यार्थ्यांनी ऐनशेत गावात केलेल्या कामाची पहाणी केली. यावेळी झालेल्या निरोप समारंभाप्रसंगी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा हे उपस्थित होते. यावेळी या विद्यार्थ्यांनी इस्रायलमध्ये देणग्या गोळा करून येथील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, पुस्तकं, कपडे आणि खेळणी आणली होती ती फिंकलश्टाईन, पालकमंत्री सवरा यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. इस्रायली विद्यार्थ्यांना विशेष सहकार्य करणारे ३६० फाऊंडेशनचे रोहन ठाकरे यांची महावाणिज्यदूतांनी भेट घेऊन आभार मानले.लिओर टुइल याने केले चक्क मराठीत भाषणफिंकलश्टाईन यांनी भारताच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्र म राबविणार असल्याचे सांगितले. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. इस्त्रायली विद्यार्थी लिओर टुइल याने मराठीत भाषण केल्याने उपस्थितांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. या परदेशी विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवेतून राबविलेले उपक्र म हे आम्हा तरुण पिढीला व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतील असे ३६० फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहन ठाकरे यांनी सांगितले.
इस्रायली महावाणिज्यदूतांनी ऐनशेत गावाला दिली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 11:59 PM