विरार : वसई-विरार परिसरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढते आहे. यातून सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी डिसेंबर २०१८ रोजी महासभेत मागेल त्याला त्याला नळजोडणी असा प्रस्ताव पारित केला होता. या ठरावानुसार गेल्या सात महिन्यात ६, ०५६ नळजोडण्या पालिकेने केल्या आहेत. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून शेकडो अर्ज येऊनही पालिकेने एकही जोडणी केली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वसई - विरार महापालिकेने १९ डिसेंबर २०१८ रोजी महासभेत मागेल त्याला नळ जोडणीचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला होता. या मोहिमेला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सात महिन्यात १० हजारांहून अधिक अर्ज महापालिकेला प्राप्त झाले. त्यातील ६, ०५६ जोडण्या देण्यात आल्या आहेत.वसई - विरार महापालिका क्षेत्रास सूर्या, उसगाव पेल्हार या पाणीपुरवठा योजनेतून २०१७ पूर्वी केवळ १३० एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर राज्यसरकारच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत वाढीव १०० एमएलडी तसेच सूर्या टप्पा ३ पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्याने वाढीव ७० एमएलडी पाणी महापालिकेला मिळाले आहे. तसेच ६९ गावांच्या पाणी पुरवठ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे शहराचा पाणीसाठा वाढला आहे. याच धर्तीवर पालिकेने मागेल त्याला नळजोडणी मोहीम हाती घेतली होती. पण जानेवारीपासून सुरु झालेल्या या मोहिमेला निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसल्याने दोन महिन्यांपासून ही मोहीम बंद आहे.प्रभागवार जोडण्याप्रभाग प्राप्त अर्ज मंजूर अर्ज दिलेल्या जोडण्याअ ४६४ २०० ३००ब ५९५ ५२१ ५८७क ५२४ ४१३ ५५७ड ४४४ २७८ ७८९ई ३६२ ११० ३३६फ १७५२ १५२८ १३०१जी १६४१ ८९९ ११४९एच ५२३ ४७२ ७४८आय ६७८ ४२८ २५९शहर अभियंता माधव जावदे यांनी सांगितले की, आचारसंहिता असल्याने जोडणी करता आली नाही, पण ही मोहीम अजूनही सुरु आहे. नियमांत जे अर्ज बसतात त्यांना आम्ही जोडणी देत आहोत.