- हुसेन मेमन, जव्हार
जव्हारमध्ये शुक्रवार सकाळपासुन बी.एस.एन.एल. सेवा खंडीत असल्यामुळे शहरातील सर्व राष्ट्रीयकृत व खाजगी बॅँकाचे व्यवहार बंद असल्यामुळे ग्राहकांची तारांबळ उडाली आहे. शुक्रवार लाईन बंद तर दुसऱ्या शनिवार, रविवारी सुट्टी तर सोमवारीही बॅँक बंद असल्यामुळे येतील खेडोपाड्यातील आदिवासी ग्राहक व व्यापारी वर्गाचे मोठे हाल झाले आहे. जव्हार हा आदिवासी तालुका असून अशिक्षित खातेदारांना बॅँकेच्या कामाकाजाचे पुरेसे ज्ञान नसते. तसेच येथे आल्यावर तांत्रिक बिघाडीमुळे कामकाज बंद झाल्याचे समजल्यास पुन्हा व्यवहार कधी चालु होतील यासाठी दिवसभर बाहेर उन्हात ताटकळत राहताता. तसेच येथील जनता ही अशिक्षित असल्याने त्यांना नेटबँकींगने व्यवहार कसे करावे याची माहिती नसल्याने त्यांना दररोज बँक उघडण्याची वाट बघावी लागते. जव्हारमध्ये इंटरनेट सेवा पुरवणारी बी.एस.एन.एल. ही एकमेव संस्था असल्याने आॅनलाईन कामेही पुर्ण पणे ठप्प झालेली आहेत. तांत्रिक मुद्या असा की, या कार्यालयाच्या कामकाजाला सुरुवात होऊन २५ वर्र्षे झाली तरी जुन्या तंत्रज्ञानावर कामकाज होते. आधुनिक काळात आठवडाभरजर इंटरनेट आभावी जगाशी संपर्क तुटत असेल तर जव्हारकरांची प्रगती तरी कशी होईल असा प्रश्न येथील भारती विद्यापिठातील विद्यार्थी विचारत आहेत.स्टेट बॅँकेच्या जनरेटरनेही दिलाय दगाजव्हार शहरातील स्टेट बॅँक आॅफ इंडिया या राष्ट्रीकृत बॅकेचे जनरेटर गेल्या काही महिन्यांपासुन ना दुरूस्त असल्यामुळे वीज गेली की, व्यवहार बंद अशी अवस्था झालेली आहे. दर शुक्रवारी जव्हारमध्ये लोड शेडींग असल्याकारणाने जनरेटर आभावी बॅँकेचे सर्व कामकाज ठप्प राहते. त्यामुळेही शेकडो ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.