लोकमत न्यूज नेटवर्क वसई : गुणांच्या टक्केवारीवरून करिअर निवडणे चुकीचे आहे. आता बेस्ट आॅफ फाईव्हमुळे ते अधिकच चुकते, असे मार्गदर्शन ज्येष्ठ समुपदेशक विवेक वेलणकर यांनी संजीवनी परिवारने आयोजित केलेल्या १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थी कौतुक मेळाव्यात केले. गुणांच्या टक्केवारीवरून नेमका कल कळत नाही. टक्केवारी चांगली असते परंतु निवडलेल्या क्षेत्राचा विषय आऊट आॅफ फाईव्ह असून शकतो. ती काळजी घ्यायला हवी. सर्व मित्र एखादे क्षेत्र निवडतात म्हणून आपणही ते निवडले तर चूक ठरेल. हे सर्व टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनीच आपल्याला आवडणारे आणि झेपणारे विषय व अजिबात न आवडणारे विषय याची वर्गवारी करून पुढील करिअर ठरवायला हवे. निवडलेल्या क्षेत्रात मेहनत आणि कष्ट करायला हवे, असेही वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. पालक भेटले की हमखास विचारतात सध्या कोणत्या फिल्डला स्कोप आहे. मी त्यांना सांगतो टॉप २० टक्केना कुठल्याही फिल्डमध्ये स्कोप आहे. तर बॉटम २० टक्क्यांना कुठेही स्कोप नाही. आपले आवडीचे क्षेत्र निवडले, मेहनत घेतली तर टॉप २० टक्के असणे सोप्प जाते. फिल्डला स्कोप नसतो तर आपण त्या फिल्डमध्ये कुठे आहोत यावर स्कोप ठरतो, असेही वेलणकर यांनी सांगितले. सुरुवातीला ज्येष्ठ विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात एमडी हार्ट स्पेशालिस्ट पूर्ण केलेल्या प्रणाली पाटील यांनी आपले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्याचबरोबर मरीन जिओलॉजी (एमएससी) मध्ये ९४.६० टक्के मिळवलेल्या अमेय नाईक, एलएलबी पूर्ण केलेल्या सुर्वेश जोशी आणि एमकॉम सीएस करीत असलेल्या अनुजा पाटील या विद्याथ़्र्यांनी आपल्या शैक्षणिक यशाचे कथन केले. नरेश जोशी यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.वर्गवारी करा...सर्व मित्र एखादे क्षेत्र निवडतात म्हणून आपणही ते निवडले तर चूक ठरेल. हे सर्व टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनीच आपल्याला आवडणारे आणि झेपणारे विषय व अजिबात न आवडणारे विषय याची वर्गवारी करून पुढील करिअर ठरवायला हवे असे वेलणकर म्हणाले.
गुणांच्या टक्केवारीवर करिअर निवडणे चुकीचे
By admin | Published: July 06, 2017 5:43 AM