- हुसेन मेमनजव्हार - येथील स्टेट बॅँकेचे शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्वर जरारे यांची उध्दट भाषा व अनियोजित कामामुळे ग्राहक चांगलेच वैतागलेले आहेत. दिवाळी सणाची खरेदी करीता ग्राहक आपल्या खात्यातून पैसे काढणे पाठवणे आदि कामा करीता बॅँकेत सोमवारी गर्दी केली होती. गर्दी इतकी प्रचंड होती की, लोक गेटच्या बाहेर लाईन लावून उभे होते. याबाबत बॅँकेत जाऊन बघितल्यानंतर पुर्ण बॅँकेत ४ ते ५ काऊंटर बंद होते. तेथे कुठलाही कर्मचारी उपलब्ध नव्हता.याबाबत लोकमतने शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्वर जरारे यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या दालनातही तुडूंब गर्दी असल्याने कर्मचारी कामी आहे का, नियोजन का नाही असे प्रश्न विचारताच त्यांचा पारा चढला. ‘तुम्ही येथून जा, आम्ही आमचे काम करु. आमच्या कामात अडथळा आणाल तर पोलिसांच्या ताब्यात देऊ’ अशी उर्मट भाषेत त्यांनी उत्तरे दिली. तसेच, लोन विभागातील कर्मचाऱ्यांकडे ग्राहक मुद्दसर मुल्ला हे शनिवार पासुन चकरा मारत होते. मात्र तेथील अधिकारी सुट्टीवर आहेत, ते आल्यानंतरच लोन ची प्रक्रीया पुढे सरकेल असे उत्तर कर्मचाºयाने दिले. याचा जाब विचारण्या साठी शाखा व्यवस्थापकांना विचारणा केली असता, तुम्ही कोण असे विचारत २ ते ३ मिनीटे ते स्तंब्ध होते. त्यांना काय बोलावे हेच सूचत नव्हते. त्यावेळी ग्राहक मुल्ला यांनी त्यांना सांगितले की, मला वाहनासाठी कर्ज हवे आहे, दिवाळीत वाहनाला चांगली सुट मिळते म्हणून मला लोन लवकर पाहिजे. मात्र तेथे लोन विभागातील मुख्य कर्मचारी ऐन दिवाळीच्या काळात सुट्टीवर गेल्यामुळे त्यांना कर्ज प्रस्ताव दाखल करता आलेला नाही.काही वेळांनी तेथील ग्राहकांनी कर्मचारी नाहीत आम्ही किती वेळ वाट बघायची असा प्रश्न करीत हल्लाबोल केला तेव्हा व्यवस्थापकांनी लोन विभागातील कर्मचाºयाला काऊंटरवर आणून बसवले. त्याशिवाय ते स्वत: एका कर्मचाºयांच्या काऊंटरवर बसले. ऐन दिवाळीच्या काळात ही अव्यवस्था असल्याने ग्राहकांची तारांबळ उडाली होती. काही वर्षापुर्वी तात्कालीन व्यवस्थापक यांनी येथील पाठवलेला संपुर्ण स्टाफ हा पनिशमेंट शिक्षा दिलेला असतो, तो असाच वागतो असे उत्तर दिले होते. म्हणूनच सध्याचे व्यवस्थापक त्रागा करीत नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.मी याबाबत वरीष्ठ विभागात तक्रार दाखल करणार असुन, शाखा व्यवस्थापक व कर्मचारी आशिष पवार यांच्या पानचट उत्तारामुळे आम्हा ग्राहकांना नाहक मानसीक व शारीरीक त्रास सहन करावा लागत आहे.-मुद्दसर मुल्ला, ग्राहक
जव्हार स्टेट बँकेत ऐन दिवाळीत रांगा, व्यवस्थापकांच्या मॅनेजमेंटचे तीनतेरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 3:21 AM