जव्हार : तालुक्यात गेल्या ३६ तासांपासून पाऊसाच्या संततधारा सुरु आहेत. या पाऊसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. महत्वाच्या रस्त्यावंर पाणी आल्याने या भागातील संपर्कचे महत्वाचे माध्यम असणाऱ्या एसटीच्या सेवेवरही त्याचा परिणाम झाला आहे. नदी, नाले, ओढे, तुडुंब भरून वाहू लागले आहेत.संपूर्ण जव्हार तालुक्याला पावसाने झोडपले असून, आतापर्यंत २९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पाऊसाच्या धारा सुरूच असल्याने दादरकोपरा, झाप, दाभलोन, दापटी असा मार्गावर काही काळ एसटीची बससेवा बंद ठेवावी लागली आहे. खाजगी वाहतुक जीप, ट्रक्स, वाहतूक देखील बंद असल्याने प्रवासी व पर्यटकांना अडकून पडावे लागले. तालुक्यातील ग्रामिण भागाकडे जाणारे मार्ग बंद झाले होते. खाजगी वाहने उपलब्ध नसल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. प्रत्येक गावाला जाणाऱ्या एसटी बस तीन तास उशीराणे सोडण्यात येत असल्योन स्थानकात मोठी गर्दी होती. रविवार सुटीचा दिवस असल्याने सुदैवाने विद्यार्थ्यांची गर्दी नव्हती. कालपासून तालुक्यात अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडल्या असल्यातरी कोणतीही जिवीत व वित्त हानी झाली नाही. तरी शेतकऱ्यांना शेतात जातांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)तलवाडा/विक्रमगड : गेल्या २४ तासात विक्रमगडला पावसाने चांगले झोडपुन काढले असुन शनिवारी रात्री पासुन ते रविवार पुर्ण दिवस पावसाने चांगले झोडपून काढले आहे़ संततधार सुरु असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून जनजिवन विस्कळीत झाले होते. रविवार सुटीचा दिवस असांनाही विक्रमगडच्या मुख्य बाजार मंदावलेला होता. पावसाच्या तडाख्यामध्ये काही काळ वीज ही गायब झाली होती. तर विजेचा लंपडाव हा चालुच होता. मात्र , आज सुटटीचा दिवस असल्याने व हवेमध्ये गारवा असल्यान ेनोकरदार वर्गाने दिवसभर सक्तीचा आराम केला़दरम्यान, आवणीसाठी (भातलागवडीकरीता ) आवश्यक असा पाऊस गेल्या दोन दिवसापासुन सुरु झाल्याने शेतकरी वर्ग सुखावलेला दिसत होता़ नुकतीच कोळी भाजीचा नेवेद्य आपल्या शेतावरील देवदेवतांना देवुन पुढील कामाच्या शुभारं भाकरीता शेतकरी सरसावले असुन येत्या दोन दिवसांत विक्रमगड व परिसरात भातलागवडीच्या कामांना शुभारंभ होईल असे येथील शेतकरी सुनिल सांबरे यांनी लोकमत शीबोलतांना सांगीतले़ जोरदार पावसाच्या आगमनाने मात्र सर्वत्र पाणीच पाणीच झाले असुन पाण्यातुन वाट शोधत जावे लागत होते़ पावसाने सर्वत्र चांगली सुरुवात केली असुन शेती योग्य असा दमदार पाउस पडला आहे़ त्यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहाणाऱ्या शेतकरी वर्गाने आता कामांना वेगाने सुरुवात केली आहे.
जव्हारमध्ये पावसाची संततधार
By admin | Published: July 11, 2016 1:45 AM