शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

जव्हार-नाशिक गोंदा घाट बनला मृत्यूचा सापळा; रस्त्याची मलमपट्टी नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:31 AM

जव्हार-नाशिक या रस्त्यातील मोखाडा व नाशिक परिसरातील तोंरांगण ग्रामपंचायत हद्दीच्या सिमेवर असलेला मोठा वळण व उतारामुळे नेहमीच अवजड वाहनांचे अपघात होत आहेत.

- हुसेन मेमनजव्हार : जव्हार-नाशिक या रस्त्यातील मोखाडा व नाशिक परिसरातील तोंरांगण ग्रामपंचायत हद्दीच्या सिमेवर असलेला मोठा वळण व उतारामुळे नेहमीच अवजड वाहनांचे अपघात होत आहेत. यामध्ये कित्येक नागरीकांचे प्राण गेले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.शिर्डी हे देवास्थान जगभरात प्रसिध्द असुन पालघर, सेलवासा व गुजरात येथून मोठ्या संख्येने साईभक्त यामार्गावरून ये-जा करतात. तसेच नाशिक हुन मोठ्याप्रमाणात भाजीपाला पालघर जिल्ह्यात दररोज येत असतो. अर्थात या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. तसेच वापी, सेलावासा व पालघर जिल्ह्यातील एम.आय.डी.सी. असल्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात मालाची ये-जा सुरू असते. अवजड वाहनांचा नाशिक-त्र्यंबक-मोखाडा-जव्हार-मनोर-चारोटी-पालघर असा मार्गक्रमण असुन या रस्त्यावर नेहमीच वाहनांच्या येरझाऱ्या असतात.या अतिरिक्त ताणामुळे या रस्त्याचा दर्जा अधिकच खालावला असुन राष्टÑीय महामार्ग विभागा या कडे दुर्लक्ष करीत आहे. याचा फटका येथील प्रवाशांंना, वहातूकदारांना होत आहे. २४ मार्च रोजी गुजरात प्रदेशातून देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची एक खाजगी बस भांगेबाबा मंदीरच्या उतारावर १०० फूट खोल दरीत जाऊन भयानक अपघात झाला.या अपघातात तिन भाविकांना आपले जिव गमवावे लागले आहे. २५ मार्च रोजी पुन्हा एका रासायनीक पदार्थ घेऊन जाणारा ट्रक त्याच ठिकाणी एखा झाडाला आदळून उलटला होता. दर आठवड्याला तीन ते चार अपघात याच अपघात प्रवण क्षेत्रात होत असातात.मोखाड्याहुन नाशिककडे जाणारा हा गोंदा घाट खूपच मोठा व वळणदार असुन पुर्णपणे उतारावर आहे. त्यामुळे र्हसुल फाटा सोडला की घाट लागतो. त्यामुळे अवजड वाहनाला वारंवार ब्रेकचा वापर करावा लागतो. आणि भांगेबाबा मंदीर पासुन जवळजवळ ८० मीटर पर्यत मोठा उतार लागतो. हा उतार संपला की, लगेचच मोठा वळण असल्यामुळे वाहन चालकाला अंदाज येत नाही, आणि वाहन सरळ त्या खोल दरीत जाऊन मोठे अपघात घडत असतात.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने तेथे कुठलीच सुरक्षा भिंत तथा अपघाती वळण तथा इतर धोकादयक वळण असा कुठलाच फलक लावण्यात आलेला नसलयामुळे मोठे अपघात होऊन शेकडो जिव गेल्याच्या घटना घडल्या आहेत.हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमीच कोट्यवधी रूपये दुरूस्तीच्या नावावर खर्च केले जाताता मात्र दुरूस्ती ही कागदोपत्रीच असते. महिन्याभरापुर्वीच या रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम करण्यात आले. मात्र ते खड्डे अगदी थातूर मातूर पध्दतीने भरले असुन आजही या रस्त्यावर खड्डेच खड्डे बघावयास मिळत आहे.ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने मोठ्याप्रमाणात या मार्गावर भ्रष्टाचार केला जात असुन हा रस्ता दुर्लक्षीत भागातला रास्ता म्हणून ओळखला जात आहे. तसेच याच मार्गावरील नाशिक हद्दीतले रस्ते मात्र चकाचक असुन रस्त्यांचा दर्जाही खूपच चांगला आहे.राज्य महामार्गाची राष्टÑीय महामार्गामध्ये जेव्हा बदल होतो, तेव्हा त्याला दजोन्नत वर्गामध्ये मोडले जाते. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार यांच्या कार्यक्षेत्रातील दुरूस्ती व देखभालीसाठी असलेला रामा.क्र. ३० एकूण लांबी ४४.४० कि.मी., रामा क्र. ७६ एकूण २०.६० कि.मी. व रामा क्र. ७३ एकुण लांबी २१.२० कि.मी. अशी एकूण ८६.२० कि.मी. लांबी अतंर्भूत रस्ता दि. ०१/०३/२०१८ पासुन राष्टÑीय महामार्ग विभागाकडे सूर्पूद करण्यात आला आहे.भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (रस्ते परिवहन आणि मंत्रालय) कडून निर्माण होत असलेल्या सिन्नर-पालघर, त्र्यंबक-बोर्डी महामागार्चे शिर्डी ते वापी दरम्यानच्या शिर्डी ते घोटी व्हाया सिन्नर राज्यमार्ग क्रमांक १२ वरील ११४ किलोमीटर , घोटी ते आंबोली व्हाया त्रंबकेश्वर राज्यमार्ग क्रमांक २३ वरील ५७ किलोमीटर, आंबोली ते जव्हार राज्यमार्ग क्रमांक ४२ वरील ४२ किलोमीटर तर जव्हार ते वापी व्हाया दाभोसा ,सिल्वासा, या राज्यमार्गावरील ८५ किलोमीटर अशा एकूण २९८ किलोमीटर लांबीच्या या राज्यमार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात आले आहे. यासाठी १५० ते २०० कोटी पर्यंत तरतूद करून या रस्त्याचे वाजत गाजत भूमिपूजन दि. ५ नोव्हेंबर २०१६ रोजी तत्कालीन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नाशिक येथे झालेले आहे. मात्र, ३ वर्षे उलटूनही रस्ता जैसे थे परीस्थितीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात