शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

जव्हार तालुक्याचे बीएसएनएल कार्यालय झाले भंगार

By admin | Published: December 25, 2016 12:15 AM

येथील बी.एस.एन.एल. कार्यालयाची अक्षरश: भंगार अवस्था झाली असून गेल्या २५ वर्षापासून जुन्या यंत्रणेलाच थिगळे लाऊन काम भागवले जाते आहे. या भंगार यंत्रणांद्वारे

- हुसेन मेमन,  जव्हार

येथील बी.एस.एन.एल. कार्यालयाची अक्षरश: भंगार अवस्था झाली असून गेल्या २५ वर्षापासून जुन्या यंत्रणेलाच थिगळे लाऊन काम भागवले जाते आहे. या भंगार यंत्रणांद्वारे काम करणे येथील कर्मचाऱ्यांचा मोठे जिकरीचे होत आहे. त्यात जव्हार येथील जे.टी.ओ.कडेच जव्हार, मोखाडा व विक्रमगडचा पदभार असल्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच रिक्तपदांचा आकडा जास्त असल्यामुळे कामे कूर्मगतीने होत आहेत. एकविसाव्या शतकात डिजीटल यंत्रणा आल्या असून वायफाय (विनातार) पध्दतीने दूरसंचाराचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र, जव्हारमध्ये आजही २५ वर्षापूर्वीच्या यंत्रांना दुरूस्त करून कशीबशी चालविली जात आहे. येथील यु.पी.एस.च्या बॅटऱ्या पूर्णपणे निकाम्या झाल्यामुळे वीज गेल्यावर यंत्रणा बंद पडत असून परिणामी संपूर्ण सेवा कोलमडत आहे. कार्यालयात पहाणी केली असता बॅटऱ्यांना अन्य दोन बॅटऱ्या जोडून यू.पी.एस. दहा मिनिटे कसेबसे चालेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत वरीष्ठ कार्यालयाकडे वर्षानुवर्षे पत्रव्यवहार करूनही कुठलीच नविन यंत्रणा दिली जात नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच वरीष्ठ विभागात कुठलेही प्रकरण गेले तरी त्याबाबतचे उत्तर महिना दोन महिना झाल्याशिवाय येत नाही. त्यानंतरच मिळतो नवीन फॉर्मनव्याने टेलीफोन कनेक्शन हवे असेल तर पहिले त्या भागात लाईन उपलब्ध आहे की, नाही याचा शहानिशा केली जाते. त्या नंतरच नविन कनेक्शन फॉर्म स्वीकारला जात आहे. गेल्या २५ वर्षापासूनम्हणजे कार्यालयाच्या जन्मापासून लावण्यात आलेल्या जिर्ण दूरसंचार यंत्राणांवरच काम सुरू आहे. जमिनी खालून गेलेल्या कॉपर केबलचा अक्षरश: चुरा झालेला असून ठिकठिकाणी जॉर्इंट मारून काम रेटले जात आहे. कल्याण एक्स्चेंजद्वारे चालतो कारभारजव्हारचे कार्यालय हे कल्याण एक्स्चेंजद्वारे चालविले जाते, त्यामुळे जव्हार ते कल्याण मध्ये कुठेही लाईन ब्रेक झाली की, जव्हारची यंत्रणा ठप्प होते. ब्रॉडबॅन्ड सेवाही बंद पडल्यास तिला पूर्ववत होण्यासाठी तीन चार दिवस लागतात. देयक मात्र पूर्ण महिन्याचे भरावे लागत असल्यामुळेही ग्राहकांत तीव्र नाराजी पसरली आहे.