विरार : वसई-पाचूबंदर येथील समुद्रात अडकलेल्या एका मासेमारी बोटीला काढण्यासाठी समुद्रात गेलेला जेसीबी भरतीच्या पाण्यात बुडाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. जेसीबीचालक सुखरूप असल्याचे कळते. वसई-पाचूबंदर येथील समुद्रकिनारी बांधून ठेवलेल्या बोटीचा दोर सुटल्याने, ती समुद्रात वाहून गेली होती. या बोटीला काढण्यासाठी जेसीबी समुद्रात उतरविण्यात आला होता. मात्र, त्याच वेळी भरती आल्याने तो समुद्रात बुडाला.