शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

अर्नाळा बीचवर जिग्नेशला जेली फिशचा डंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 12:09 AM

आपल्या मित्रांबरोबर अर्नाळा बीचवर खेळणाऱ्या जिग्नेश तांडेलला रविवारी जेली फिशने चावा घेतला. त्याच्यावर नेमके काय उपचार करायचे याची कल्पना नसल्याने दोन डॉक्टरांनी त्याला पेनकिलर देऊन मुंबईस नेण्याचा सल्ला दिला.

विरार : आपल्या मित्रांबरोबर अर्नाळा बीचवर खेळणाऱ्या जिग्नेश तांडेलला रविवारी जेली फिशने चावा घेतला. त्याच्यावर नेमके काय उपचार करायचे याची कल्पना नसल्याने दोन डॉक्टरांनी त्याला पेनकिलर देऊन मुंबईस नेण्याचा सल्ला दिला.अर्नाळा नाळेपाडा येथील राहणारा जिग्नेश रविवारी सायंकाळी आपल्या मित्रांबरोबर समुद्रात खेळत असताना जेली फिशने त्याच्या पायाला पकडले. होऊ लागलेल्या वेदनेने जिग्नेश जोराजोरात रडू लागला. त्याचा आवाज ऐकून गावकºयांनी धाव घेऊन त्याला पाण्यातून उचलले असता जेली फिशने त्याला पकडल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी ओरबाडून जेली फिश पायावरु न काढून टाकली. पण तिचे काटे त्याच्या पायात रुतून राहिल्याने त्याला यातना होऊ लागल्या. त्याला त्वरीत गावातील दवाखान्यात नेले. तेथील डॉक्टरांना त्यावर काय उपचार करायचे हे न कळल्याने त्यांनी पेनकिलर देऊन त्याला विरार येथील संजीवनी रु ग्णालयात घेऊन जा असे सांगितले.संजीवनी रु ग्णालयातही तशीच परिस्थिती असल्याने त्यांनीही त्याला मुंबईला नेण्याचा सल्ला दिला. त्याला होत असलेल्या यातना बघता मुंबई पर्यंतचा प्रवास करणे शक्यच नव्हते. हे बघून वसई पंचायत समितीच्या माजी सदस्या ज्योती कुडू यांनी आगाशी आरोग्य केंद्राचे डॉक्टर ऋ ग्वेदन दुधाट यांच्याशी संपर्क केला. त्यांनी विरार मधील अंकुर हॉस्पिटलचे डॉ. शैलेश बारोट यांच्याशी चर्चा करुन जिग्नेशला अंकुर हॉस्पिटलमध्ये दाखल करवून घेतले. त्यांनी विचारविनिमय करु न त्याच्यावर उपचार सुरु केले आहेत. वसई तालुक्याला विस्तीर्ण किनारा लाभलेला आहे. जेली फिशने डंख मारल्याची ही पहिलीच घटना आहे.औषध उपलब्ध करून द्याभविष्यात ही अशी घटना घडू शकते, हे लक्षात घेऊन शासनाने वसई तालुक्यातील डॉक्टर आणि जनतेमध्ये याबाबत जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत डॉ. दुधाट यांनी व्यक्त केले. तर शासनाने पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी लगतच्या सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयात जेली फिशच्या डंखावरील प्रभावी औषध मुबलक प्रमाणात उपलब्ध करु न द्यावे, अशी मागणी ज्योती कुडू यांनी केले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार