पालघर : नेरुळ येथे झालेली मॅरेथॉन जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमी झडपोलीचा आयकॉन खेळाडू ज्ञानेश्वर मोरघा याने जिंकली पुरुषांच्या खुल्या गटांत त्याने २१ की.मी. व अमित माळीने १० की.मी अंतर यशस्वीरित्या पूर्ण करून सुवर्णपदक मिळवले.जिजाऊ स्पोर्ट्स अॅकॅडमीचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांनी ठाणे-पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरु णामधील सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांना योग्य त्या सोयीसुविधा पुरविल्यामुळे आज ज्ञानेश्वर मोरघा व अमित माळी यांच्या सारखे आदीवासी धावपटू आपली गुणवत्ता सिद्ध करून सुवर्ण पदके मिळवीत आहेत. आपल्या व्यवसायामधून मिळालेल्या नफ्यातील लाखो रुपयांच्या निधींचा योग्य विनियोग निलेश सांबरे हे ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक, आरोग्य, विज्ञान, कला-क्रीडा आदी उपक्रमांसाठी सढळ हस्ते खर्च करीत आहेत.ग्रामीण भागातील जिजाऊ स्पोर्ट्स अॅकॅडमीचे नाव उज्ज्वल करणाºया या खेळाडूंच्या पाठीवर सांबरे यांनी कौतुकाची थाप देऊन ते लवकरच भारताच्या आॅलिंपिक संघात दिसतील अशी आशा व्यक्त केली.
जिजाऊच्या मोरघा, माळीने नेरूळ मॅरेथॉन जिंकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:31 AM