नालासोपारा : वसईच्या कोळीवाडा विभागातील तरु णाला परदेशात नोकरी लावतो असे आॅगस्ट २०१८ पासून आतापर्यंत आमिष दाखवून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. त्या तरु णाने वसई पोलिसांत जाऊन तक्र ार दिल्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रजिया अपार्टमेंटच्या रूम नंबर २१८ मध्ये राहणाऱ्या इमरान मोहमद कासीम (२९) या तरु णाला युएइ येथे नोकरी लावण्याचे आमिष दाखवत फसवणूक झाली आहे. आरोपी शब्बीर अहमद हिंदुस्थानी याने वसईच्या कोळीवाडा विभागात अमलकी हज ट्रॅव्हल्स नावाचे आॅफिस उघडले होते. त्याने मुंबईच्या लेमिंग्टन विभागात ए. बी. टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स नावाच्या आॅफिस मालक फिरोज खान याच्यासोबत संगनमत करून युएइ येथे नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते. मेडिकल करण्यासाठी व आॅफर लेटर साठी इमरान कडून ५ हजार रु पये रोख घेतले होते आणि व्हिजा आल्यावर ४५ हजार रु पये द्यावे लागतील असे सांगितले होते.
विश्वास संपादन करण्यासाठी यूएइ तील ग्लिनो मस्की या कंपनीत वॉटर रिफायनींगचे काम लागल्याचे लेटर पॅडवर बनावट नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच कासीम आणि साक्षीदारांचे पासपोर्ट ताब्यात घेऊन कंपनीचे करारनामा आणि तिकीट असे आरोपीकडून सांगण्यात आले होते. यानंतर साक्षीदार इकबाल, राशीद आणि उदय यांचे व्हिजा आला असून कासीमला आरोपींच्या सिंडिकेट बँकेच्या खात्यामध्ये ७९ हजार रु पये भरणा करण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणांनी वसई पोलीस ठाण्याकडे धाव घेतली आहे. पोलिसांनी तक्र ारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून या आरोपीनी किती जणांना आतापर्यंत फसवले असल्याचा शोध सुरू केला आहे.
फसवणूक प्रकरणी कालच गुन्हा दाखल केला असून ७ ते ८ जणांना फसविले असल्याचे पुढे आले आहे. यांनी अजून काही लोकांना फसवल्याची शक्यता नाकारता येत नाही. लवकरात लवकर आरोपींना पकडण्यात येईल.- राजेंद्र कांबळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई पोलीस ठाणे)