सफाळे : सफाळे येथे महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यार्थी भारतीने संयुक्त महाराष्ट्र लढा व्हाया लोककला हा कार्यक्र म आयोजित केला होता त्यास संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या जनतेने उदंड प्रतिसाद दिला . या कार्यक्र मात सफाळा जन्मभूमी असलेल्या शाहिर आत्माराम पाटील यांच्या पत्नी शाहिर इंद्रायणी आत्माराम पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्मा झालेले सर्वात लहान वीर हुतात्म्ये सीताराम बनाजी पवार यांच्या कुटुंबियांना पुरस्कार देऊन गौरविले अशी माहिती विद्यार्थी भारतीच्या विद्यापीठ सचिव पल्लवी पाटील यांनी दिली.ज्येष्ठ साहित्यिक राजन खान हे प्रथमच सफाळा परिसरात आले होते. १ मे महाराष्ट्र दिन हा लोककलेच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकांसमोर मांडण्याची कल्पना पाहून ते थक्क झाले. आज लोप पावत चाललेल्या लोककलेचा उत्तम अविष्कार तरु ण वर्गाकडून होतो आहे. हे पाहून आनंद वाटला, असे ते म्हणाले. विद्यार्थी भारती तर्फे संपूर्ण कार्यक्र म पार पडला त्याचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले . कार्यक्र माचे उदघाटन लक्षवेधी होते . संस्थापक किशोर दादा जगताप, वाघिणी अध्यक्षा ज्योती बडेकर, मराठी भारती अध्यक्षा अँड. पूजा बडेकर , विद्यार्थी भारती अध्यक्ष विजेता भोनकार यांच्या हस्ते पालघर भूषण म्हणून शशिकांत गुघे तर आम्ही शुक्र ाचार्य हा पुरस्कार धनंजय आदित्य यांना देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला व श्रोत्यांना मार्गदर्शन केले अशी माहिती विद्यार्थी भारती च्या विद्यापीठ अध्यक्षा ज्योती निकाळजे यांनी दिली.मोठया उत्साहाने महाराष्ट्र दिनाचा हा सोहळा विद्यार्थी भारती राज्य संघटकांच्या नेतृत्वाखाली सफाळे विभागांत साजरा करण्यात आला अशी माहिती प्रमुख आयोजक मोनाली भोईर व विद्यार्थी भारतीच्या कोकण प्रवक्ता जुई पाटील यांनी दिली आहे.(वार्ताहर)
संयुक्त महाराष्ट्र लढा व्हाया लोककला उत्साहात
By admin | Published: May 03, 2017 5:03 AM