शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कामगार भाजल्याचा प्रकार १५ दिवस दडपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:23 AM

कंपनीत कामावर असतांना व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे कामगाराच्या अंगावर अ‍ॅसिड पडून तो गंभीररीत्या जखमी झाल्याची घडली आहे.

राहुल वाडेकर । विक्रमगड : कंपनीत कामावर असतांना व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे कामगाराच्या अंगावर अ‍ॅसिड पडून तो गंभीररीत्या जखमी झाल्याची घडली आहे. यामधुन तो कामगार सुदैवाने बचावला असून त्याच्यावर बोईसर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु  आहेत. रविवारी या घटनेस दोन आठवड्याचा कालावधी लोटला अतानाही  कंपनी व्यवस्थापनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिस व प्रशासनापासून दडवुन ठेवली  जात असल्याचा धक्कादायक प्रकार देखील  येथे उघडकीस आला आहे. त्यामुळे या कंपनीची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शेलपाडा वासियांनी केली आहे.    तुषार ढोणे (२७) असे या अ‍ॅसिड आंगावर पडून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचे नाव असून तो विक्र मगड तालुक्यातील शेलपाडा येथील रहिवासी आहे. तालुक्यातील आलोंडे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेली इस्टिम इंडस्ट्रीज प्रा.ली ही केमिकल कंपनी असून दि.१७ जुलै २०१७ रोजी तुषार रात्रपाळीला असताना रात्री १२.३० ते १.३० वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या प्लांटमध्ये असिडचे नमूने घेतांना तो पाईपचा वॉल्व उघडण्यास गेला असता तो पुर्ण निघाला त्यात तो पडल्याने त्याचे हात व पाय भाजून त्यास गंभीर जखमा झाल्या आहेत.अपघातानंतर त्यास वाडा येथील खाजगी रुग्णालयामध्ये प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, जखमा जास्त असल्याने  त्यास पुढील उपचारासाठी बोईसर येथील खाजगी रुग्णालयात मध्ये दाखल करण्यात आले आहे. बाईसरच्या खाजगी रुग्णालयाकडून या प्रकरणी तात्काळ बोईसर पोलिस स्टेशनला कळविण्यात आले. त्यानंतर पोलिस जबाबासाठी रुग्णालयात येथे गेले परंतु घडलेल्या प्रकरणाबाबत बोईसर पोलिस स्टेशन येथून नोंदीची खात्री करण्यासाठी संपर्क केला असता पालिसांकडून अद्याप पर्यंत नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अपघाताबाबत इस्टिम कंपनीने पोलिस स्टेशनला माहिती न दिल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.