डहाणू : नव्या समाज व्यवस्थेत कातकरी समाजाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. संपूर्ण कातकरी समाज राज्यभर दुर्लक्षित आहे कातकरी समाज तर शासन दरबारी कागदोपत्रीही दुर्लक्षितच राहिला आहे. येथील काही कातकरी दैनंदिन मजूरीवर आपला चरितार्थ चालवित आहेत. यांमधील काही कुटूंबे भूमिहीन आहेत तर काही खोपटी व कच्चे बांधकाम असलेल्या घरात राहत आहेत. कातकरी समाजातील कुटुंबे अशी आहेत की त्यांना स्वत:च्या निवाऱ्यासाठी स्वत:चं घरसुद्धा नाही आणि काहींच्या वसाहतींची ग्रामपंचायतींनध्ये नोंदच आढळून येत नाही. यांच्या घरांमध्ये शौचालय तर नाहीतच परंतु या समाजातील एकही कुटुंब सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत नाही. समाजाच्या काहीं वसाहतीत विजेचे कनेक्शनसुद्धा नाहीत. कातकरी समजाच्या कुटुंबीयांना ग्रामपंचायतीच्या नळ योजनेचा लाभ मिळालेला नाही. शिवाय आजपर्यंत या कातकरी समाजाची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे निदर्शनात येत आहे. या समाजाला अंत्योदय योजनांचा काही प्रमाणात लाभ मिळालेला आहे पण त्याकरीता श्रमिक सहयोग परिवाराला खूप मेहनत करावी लागली (वार्ताहर)
नव्या समाजव्यवस्थेत कातकरी उपेक्षित
By admin | Published: November 14, 2015 11:18 PM