शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

‘कवी’ने वाढला समुद्रात संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:26 PM

जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक मोर्चा : वसई, उत्तन, अर्नाळा विरुद्ध पालघर, डहाणू

- हितेन नाईक 

पालघर : समुद्रातील मासेमारी क्षेत्राबाबत नियमावली बनविण्यात शासनाने दाखविलेल्या उदासीनतेचा फायदा उचलीत दुसरीकडे मच्छीमारांच्या लवादाचे निर्णय पायदळी तुडवीत वसई, उत्तन, अर्नाळा, मढ आदी भागातील काही मच्छीमारांनी समुद्रात थेट दिव-दमणपर्यंत कवीचे क्षेत्र विस्तारत नेले आहे. त्यामुळे पालघर-डहाणू भागातील मच्छीमाराचे मत्स्यउत्पादन कमालीचे घसरले. रोजीरोटीच्या प्रश्नासह डोक्यावर वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेलेल्या दमण ते दातीवरे मधील मच्छीमार एकजूट झाला असून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आर या पार च्या लढाईची घोषणा देत धडक द्यायला सज्ज झाला आहे.

जिल्हा संरक्षण समितीने ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याकडे केलेल्या तक्र ारीची दखल घेत त्यांनी दोन्ही कडच्या मच्छीमारांची बैठक घेतली. त्यात पालघर, डहाणूतील मच्छीमारी व्यवसायावर अतिरिक्त कविमुळे विपरीत परिणाम होत असल्याने वसई-उत्तन मधील मच्छीमारांनी सातपाटी गावासमोरील ४२.५ सागरी मैलाच्या (नॉटिकल) पुढे ३२० डिग्री क्षेत्रातील सर्व कवी काढून टाकण्याचे आदेश दिले. त्या आदेशाच्या विरोधात २००४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात वसईसह अन्य मच्छीमारांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला या संदर्भातील कायदे बनविण्याचे आदेश दिले. त्यानंतर १५ वर्षात अनेक राजकीय पक्षांची सरकारे आली परंतु हा प्रश्न सुटावा असे कुणालाही मनापासून वाटले नाही.

सन १९८० च्या दरम्यान वसई तालुक्यातील काही मच्छीमारांनी दातीवरे, वडराई, सातपाटी गावाच्या समोरील समुद्रात खुंट रोवून अतिक्र मण केल्याने मोठा संघर्ष निर्माण झाला होता. त्यावर १९८२ मध्ये तालुक्यातील २८ गावांची समिती (लवाद) नियुक्त करून वसई, अर्नाळा भागातील मच्छीमारांनी एडवण ते वडराई गावाच्या मासेमारी क्षेत्र सोडून त्यांच्या बाहेरील क्षेत्रात कवी मारण्याची मुभा दिली होती. वरील गावे भविष्यात व्यवसायात प्रगतिशील झाल्यानंतर वसईच्या मच्छीमारांनी आपल्या कवी काढून घ्याव्यात असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता.

लवादाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्येक भागातील मच्छीमार करीत आले असताना वसई तालुक्यातील मच्छीमारासह उत्तन, मढ आदी भागातील हजारो मच्छिमारांनी मात्र आपल्या कवींचे क्षेत्र थेट दिव-दमण, जाफराबाद पर्यंत विस्तारित नेले आहे. रूढी, रीती-रिवाज, लवाद याला कायदेशीर चौकट (शासन मान्यता) नसल्याने आणि समुद्रात कायदे बनविण्याच्या अनेक वर्षाच्या मागणीकडे राज्य व केंद्र शासनाने दुर्लक्ष केल्याने आपण समुद्रात कुठेही, कशाही पद्धतीचा अवलंब करून मासेमारी करू शकतो. या भावनेने १९८० पासून हळूहळू शेकडो कवींच्या संख्येने सुरू झालेली घुसखोरी आज हजारो कवींच्या संख्येत परिविर्तत झाले असल्याची टीका धंदा संरक्षण समितीचे उपाध्यक्ष सुभाष तामोरे यांनी केली आहे. या संदर्भात उत्तन येथील मिच्छमार नेते तसेच महाराष्ट्र मिच्छमार कृती समतिीचे अध्यक्ष लिओ कोलॅसो ह्यांच्याशी प्रतिक्रि ये साठी अनेक वेळा मोबाईल वर संपर्क करूनही त्यांनी फोन उचलला नाही. कव म्हणजे काय?समुद्रात बोंबील अथवा पापलेट माश्याच्या मासेमारी साठी दोन लाकडी अथवा लोखंडी खांब (अंदाजे २० फूट ते ६० फूट) समुद्रातील तळ जमिनीच्या आत गाडले जातात. त्या दोन खांबांना डोल नेट पद्धतीचे जाळे लावले जाते.ह्या खांबांना ३० ते ४० फूट लांबीच्या जाडजूड दोरखंडाला तरंगते फ्लोट्स लावले जातात.अश्या एका बोटींच्या मालकीच्या ३० ते ४० कवी समुद्रात मारलेल्या असतात.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारfishermanमच्छीमार