विरार : विरार मधील काही दुकानांचे नामफलक हे अद्याप हि मराठी नसल्यामुळे तसेच अनेक दुकानांच्या नामफलकावर मराठीतील नाव छोट्या अक्षरात लिहिल्यामुळे मनसे आक्र मक झाली असून दुकानदार आणि मनसेत पुन्हा एकदा जुंपली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी विरार पश्चिमेतील मराठी नामफलक नसणाऱ्या अनेक दुकानदारांना भेटून नामफलक मराठीत करण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे.तसेच अनेक दुकानांच्या फलकावरील नावे ही अगदीच छोट्या आकारात असल्याने मनसे कार्यकर्ते नाराज आहेत. मराठी नामफलक हे लहान अक्षरात व इंग्रजी भाषेतील नामफलक हे मोठ्या अक्षरात लिहून मराठी भाषेचा अवमान केला आहे. असे सांगून त्यामुळे ज्या दुकानदारांचे नामफलक हे लहान अक्षरात आहे त्यांना मनसे कार्यकर्त्यांनी ते मोठ्या अक्षरात लिहण्याची व ज्या दुकानदारांचे नामफलक मराठीत नाही त्यांना ते बदलण्यासाठी १० दिवसांची निर्वाणीची मुदत दिली आहे.दुकानाचे नामफलक हे मराठी मध्ये असणे गरजेचे आहे, जे आम्ही लिहिले आहे. कायद्यात असा कोणताही उल्लेख नाही की नाव हे मोठ्या अक्षरातच हवे. त्यामुळे आम्ही ते आता बदलणार नाही. कारण आमच्या दुकानाच्या लोगोची नोंदणी झाल्याने ते बदलणे शक्य नाही तसेच आम्ही कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नाही .- तेजस सावला, दुकानदारज्यांच्या दुकानांच्या नामफलक हे इंग्रजीत आहे त्यांना एक निवेदन देण्यात आले आहे की, नामफलक मराठीतच लिहावेत. ज्या दुकानांचे नामफलक हे मराठीत लहान अक्षरात आहे त्यांना आम्ही विनंती केली आहे की, त्यांनी ते मोठ्या अक्षरात लिहावेत. जेणे करून महाराष्ट्रात मराठी भाषा जपली जाईल.-उद्धव कदम, मनसे कार्यकर्ते,शाखा अध्यक्ष, वॉर्ड क्र .१७
दुकानांचे फलक मराठीच ठेवा; मनसे झाली आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:47 PM