लोकमत न्यूज नेटवर्क मोखाडा : वाडा-खोडाळा या मुख्य रस्त्यावरील ब्रिटिशकालीन गारगाई पूल धोकादायक बनला आहे. या पुलाच्या खालच्या बाजुला काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत. पावसामुळे पुलाखालच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने तो कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. याकडे मोखाडा सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले असल्याने संताप व्यक्त होते आहे. पुलावर एका बाजूने दगड लावले असल्याने एकाच बाजूने वाहनांची रहदारी सुरु आहे. परंतु या रस्त्यावरून रोजच शेकडो वाहनांची ये- जा चालू असते. दरम्यान, या पुलाची आम्ही पहाणी केली असून त्या पुलाच्या दुरूस्तीबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवलेला आहे. सध्याच्या स्थितीला पुलाच्या एकाबाजूने वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. दिवाळीच्या आसपास या पुलाच्या दुरूस्तीला मंजुरी मिळणार आहे अशी, माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता सुरेश बोडके यांनी लोकमतला दिली.
खोडाळा-वाडा रस्त्यावरील गारगाई पूल धोकादायक
By admin | Published: July 04, 2017 5:26 AM