वसई : ओएनजीसीच्या वसई समूद्रातील तेल सर्वेक्षणामुळे समुद्रातील मासेमारीला बंदी करण्यात आल्याने मासळींचा सध्या तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मासळी महाग झाली आहे. काही माशांच्या किमती दुपटीने वाढल्याने मत्स्य खवय्यांना त्याचा मोठा फटका बसायला सुरूवात झाली आहे.
वसई तालुक्यात अर्नाळा, पाचूबंदर, नायगाव आणि इतर भागांत मोठ्या प्रमाणावर मासेमारीचा व्यवसाय केला जातो. मात्र ओएनजीसी कंपनीने या भागात तेल सर्वेक्षण सुरू केल्याने मासेमारी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे बाजारात कमी मासळी उपलब्ध झाली आहे. हिवाळ्यात मासळीची मागणी मोठ्या प्रमाणात असते, मात्र या वेळी या माशांची आवक घटली आहे. त्यामुळे माशांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. जे किरकोळ विक्र ेते बाजारात विकण्यासाठी मासळी खरेदी करतात त्यांनाही चढयÞा दराने खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे बाजारातही मासळीचे भाव २०० ते ३०० रु पयांनी वाढले आहेत.
मासेमारीसाठी येथील मच्छीमार समुद्रात खोलवर बोट घेऊन जातात. त्या ठिकाणी १५ दिवस, एक महिना अशी मासेमारी केली जाते. मात्र, आता मासेमारी बंद असल्याने मच्छीमारांना बोटी किनाऱ्यावरच लावून ठेवाव्या लागल्या आहेत. मासेमारीला आॅगस्ट महिन्यानंतर सुरु वात होत असते, तेव्हा मोठ्यÞा प्रमाणात मासे बाजारात येत असतात. मात्र, तेल सर्वेक्षणामुळे आता मच्छीमारांच्या उत्पन्नावरही परिणाम होणार आहे, असे मच्छीमारांनी सांगितले.यंदा पावसाळयÞात मच्छीमार वादळी वाºयांमुळे संकटात सापडले होते. आता या बंदीमुळे त्यांना पुन्हा आर्थिक फटका बसला आहे. वसईतील नायगाव कोळीवाडा, अर्नाळा, पाचूबंदर व आजूबाजूच्या परिसरातील शेकडो मच्छीमार मासेमारीचा व्यवसाय करतात. मासेमारी हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने त्यांच्या उदरिनर्वाहाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. सरकारकडून त्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही.तेल सर्वेक्षणाचा फटका समुद्री जिवांनाच्वसई ते डहाणूपर्यंतच्या समुद्रकिनाºयावर गेल्या दोन वर्षात अनेक सागरी जीव मृत किंवा जखमी अवस्थेत कोळी बांधवांच्या जाळ्यात सापडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. या सागरी जीवांमध्ये डॉल्फीन व दुर्मिळ प्रजातींच्या कासवांचा समावेश आहे. आतापर्यंत ३० पेक्षाही जास्त डॉल्फीन मृत झाल्याचे मच्छीमार बांधवांकडून सांगण्यात येते.च्या अगोदरही ओएनजीसी कंपनीच्यावतीने एक सर्वे केला जात होता. त्यात खोल समुद्रात स्फोट करण्यात आल्यामुळे त्याच्या हादºयाने डॉल्फीन मासे व कासवे दगावत असल्याची माहिती मच्छीमार बांधव करीत आहेत. दोन वर्षापूर्वी २५ किलो वजनाचे आॅलिव्ह रिडले प्रजातीचे कासव राजोडी समुद्रकिनारी सापडले होते.च्ओएनजीसी कंपनीच्या वतीने करण्यात येणाºया स्फोटांबद्दल त्यावेळी ठोस माहिती नव्हती. तरी जखमी व मृत समुद्री जीव डहाणू ते वसई किनारपट्टीवर लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामूळे आता पुन्हा हे तेल सर्वेक्षण समूद्री जिवांच्या जिवावर बेतण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.ओएनजीसीने सर्वेक्षणामुळे मच्छीमारीच्या कालावधीत मासेमारी बंद करावी लागली आहे. त्यामुळे मासळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणी जास्त मात्र आवक कमी त्यामुळे किरकोळ विक्र ेत्यांना चढयÞा दराने मासळी खरेदी व विक्र ी करावी लागत आहे.- विजय वैती, मच्छीमार