शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

टाईमपाससाठी अपहरणाचा बनाव, पोलिसांकडून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 4:47 AM

पोलिस पोहचले घरी : टाईमपास करणाऱ्या तरुणावर १७२ अंतर्गत गुन्हा दाखल

वसई : पोलीस हे जनतेच्या सेवेकरता असतात याचे भान सर्वानीच ठेवले पाहिजे. मात्र टाईमपास म्हणून पोलिसांना अपरात्री फोन करून स्वत:चे अपहरण झाल्याचा फोन करणाºयावर पोलिसांनी कायद्याचा हिसका दाखवून त्याला अटक केली आहे. स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचून पोलिसांना कामाला लावणाºया या तरु णाचे नाव शिवकुमार गौतम (३६) असे आहे. त्याने ३ जानेवारीला रात्री ९.१५ च्या सुमारास त्याच्या मोबाईलवरु न सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जाधव यांना फोन लावून आपले तुंगारेश्वर फाटा येथून आपले अपहरण झाल्याची माहिती दिली होती.

फोनवर बोलताना त्याने खुप घाबरला असल्याचा अभिनयही केला. आपले अपहरण केले असून ते लोक अज्ञात स्थळी घेऊन जात आहेत असे त्याने सांगितले. त्याने त्याच्या मोबाईलवरु न हा फोन केल्यानंतर लगेचच फोन स्विचआॅफ झाला होता.तातडीने चार सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि कॉन्स्टेबलचा फौजफाटा तृंगारेश्वर फाटा येथे पोहोचल्यानंतर त्यांनी शोध मोहिम सुरु केली पण शिवकुमार गौतमचा काही पत्ता लागला नाही.

पोलिसांनी स्विच आॅफ झालेल्या गौतमच्या मोबाईलचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. दुकानदार आणि स्थानिकांची चौकशी केली पण त्यातून गौतमच्या बेपत्ता होण्याबद्दल कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. त्यानंतर पोलिसांनी गौतमच्या घरचा पत्ता शोधून त्याच्या कुटुंबियांशी बोलण्याचा निर्णय घेतला. चार जानेवारीला पहाटेच्या सुमारास जेव्हा पोलीस पथक वसई फाटा येथील गौतमच्या घरी पोहोचले तेव्हा समोर गौतमला पाहून त्यांना धक्का बसला. गौतम आरामात झोपला होता. पोलिसांना दरवाजात पाहून गौतमला धक्का बसला. आपण गंमत म्हणून फोन केला होता. माझा फोन कॉल गांभीर्याने घ्याल असे वाटले नव्हते असे त्यांना पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी चुकीची माहिती दिल्या प्रकरणी कलम १७२ अंतर्गत गौतमला अटक केली. 

टॅग्स :KidnappingअपहरणVasai Virarवसई विरार