शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जनतेच्या समस्या जाणून घ्या, वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 11:48 PM

महासचिव अरूण सावंत : वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा

डहाणू : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी डहाणू पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. तळागाळातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी न्यायाचा लढा उभारला पाहिजे, असे आवाहन वंचितचे महासचिव अरुण सावंत यांनी यावेळी केले. जिल्हाध्यक्ष गणेश प्रधान, वंचितचे लोकसभा उमेदवार सुरेश पाडवी, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सावंत यांनी वंचित भारिपची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, सर्व समाज घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र आले पाहिजे. बहुजन समाजाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. त्यांचा विचार करून सर्वांना संवैधानिक न्याय मिळवून दिला पाहिजे. कार्यकर्त्यांनी साखळी पध्दतीने पक्ष वाढीसाठी काम करण्याची तयारी केली पाहिजे, असे सांगत त्यांनी शासनाच्या सदोष धोरणांवर टीका केली. जिल्हा अध्यक्ष गणेश प्रधान यांनी पक्ष वाढविण्यासाठी, शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत करण्याबाबत मार्गदर्शन केले.अ‍ॅड.विराज गडग यांनी आदिवासी चळवळ, राज्यघटनेतील ५ वी व ६ वी अनुसूची यावर विचार मांडले. संविधानाची शपथ घेणारे लोकप्रतिनिधीच अनेकदा संविधानातील तत्त्वांची पायमल्ली करत आहेत, असे लोकप्रतिनिधी हे देशद्रोही असल्याची सडकून टीका करताना पालघर विधानसभा निवडणूक लढण्याचा मनोदय व्यक्त केला. चिंतामण मोहंडकर यांनी १९४८ चा कुळवहिवाट जमीन कायदा, १९७२ चा आदिवासी वन अधिकार कायदा, तसेच २०१० चा जल वितरण विधेयक या तीन कायद्याच्या तरतुदी सांगताना शासनाने आदिवासी समाजाला जमीन, जंगल व जल यापासून कसे दूर करण्याचा प्रयत्न केला जातो याबद्दल विचार मांडले. या कार्यक्रमात डहाणूतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी वंचितमध्ये प्रवेश घेतला. वसई, विरार, नालासोपारा, भिवंडी, ठाणे, वाडा, तलासरी, विक्र मगड, पालघर, डहाणू, जव्हार, मोखाडा, बोईसर या भागातील भारिप वंचितचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीVasai Virarवसई विरार