वाडा : कुडूस हे भिवंडी वाडा महामार्गावरील मुख्य थांब्याचे ठिकाण असून येथे ठाणे, मुंबई, भिवंडी, कल्याण व जव्हार पालघर वाडा कडे ये जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र, एस. टी. थांब्यालाच भाजी विक्रेत्यांनी वेढल्याने प्रवाशांना बसमध्ये चढणे व थांबणे कसरतीचे बनले आहे.कुडूस हे बाजारपेठेचे मोठे ठिकाण आहे. येथे इंग्रजी, मराठी, हिन्दी माध्यमातून शिक्षण घेणाºया मुलांच्या सात संस्था आहेत. हे सर्व प्रवासी व विद्यार्थी एस.टी.ने प्रवास करणारे असल्याने त्यांना भाजी विक्रेत्यांच्या टोपल्या ओलांडून जातांना त्रास होतो. शिवाय महिलांना चुकून धक्का लागल्यास भांडणाला सामोरे जावे लागते.यातच भर म्हणून येथील किराणा दुकानदार दुकाना बाहेर रस्ता अडवून आपल्या मालाची पोती ठेवीत असल्याने प्रवाशांनी चालायचे कोठून हा प्रश्न जटील बनला आहे. हातगाडी व अनधिकृत टपरी धारक वाटेल तेथे आपले बस्तान मांडून आहेत. येथे मोठी ग्रामपंचायत आहे. शेजारीच पोलीस चौकी आहे. मात्र पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासन या अतिक्र मणा बाबत हातबांधून आहेत. हतबल पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाला वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व वाडा तहसीलदार समज देतील काय? अशी येथील विद्यार्थी व प्रवाशांची मागणी आहे.
कुडूस एस.टी. थांब्याला भाजी विक्रेत्यांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 4:40 AM