वाडा : तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा असणारा कुडूस-चिंंंचघर-देवघर-गौरापूर या रस्त्याच्या कामाला पाच वर्षे पूर्ण होत आली आहेत. मुदत संपूनही काम अपूर्ण आहे. अजूनही काम कासवगतीने सुरू असून या कामात नियमाप्रमाणे साहित्य वापरले जात नसल्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्वाभिमान संघटनेने केला आहे.
१२ कि.मी. लांबीचा हा रस्ता असून त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ९ कोटी ४० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हे काम सांगले कन्स्ट्रक्शन नाशिक यांना देण्यात आले आहे. परंतु या ठेकेदार एजन्सीने हे काम वाड्यातील २ सबठेकेदारांना दिले आहे. चिंचघरपासून पुढे काम अर्धवट असून मोऱ्या खोदण्यात आलेल्या आहेत. या रस्त्याच्या कामासाठी वापरले जाणारे साहित्य हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. मोºयांसाठी वापरल्या जाणाºया पाईपला दोन्ही बाजूनी क्रॉसिंग करून पाईप टाकला पाहिजे, परंतु तसे होत नाही. त्यामुळे रस्त्यावरून अवजड वाहनांची ये-जा सुरू झाल्यावर पाईप फुटण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे पाईप टाकण्यापूर्वी त्याखाली काँक्रिटीकरण झाले पाहिजे ते ठरलेल्या जाडीचे होत नाही.एकंदर अंदाजपत्रकानुसार काम केले जात नसल्याचा आरोप स्वाभिमान संघटनेने केला आहे. या प्रकरणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जितेश पाटील यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. त्याच्या प्रती अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जिल्हाधिकारी यांना माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.या रस्त्याच्या कामात दिरंगाई केल्याने ठेकेदाराला दंड आकारण्यात आला असून अपूर्ण राहिलेले काम जानेवारीपर्यंत पूर्ण होईल.-विनोद घोलप, शाखा अभियंतामुख्यमंत्री ग्रामसडक योजना