शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

लेंडी धरणग्रस्तांचा ठिय्या सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:43 AM

जव्हारमधील लेंडी धरणात जमीनी गेलेल्या ग्रामस्थांच्या व शेतकºयांच्या प्रलंबित मागण्यासाठी संघर्ष समितीने शनिवारी (१७ फेब्रुवारी) धरणापासून काढलेल्या पदयात्रेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले.

पालघर : जव्हारमधील लेंडी धरणात जमीनी गेलेल्या ग्रामस्थांच्या व शेतकºयांच्या प्रलंबित मागण्यासाठी संघर्ष समितीने शनिवारी (१७ फेब्रुवारी) धरणापासून काढलेल्या पदयात्रेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले.या कामाला प्रत्यक्षात सन २००७ साली सुरु वात करण्यात आल्या नंतर बुडीत क्षेत्रातील शेतकºयांच्या जमिनी अनिधकृतपणे ताब्यात घेण्यात आल्या. त्यावेळी शेतकºयांनी या कामाला विरोध केला असता पोलिसी बळाचा वापर करून त्यांचा लढा दडपून टाकण्यात आला. या अन्यायामुळे आज हे सर्व धरणग्रस्त आपल्या नुकसान भरपाईला मुकल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे.या धरणासाठी १७९ हेक्टर जमीन अनिधकृतपणे अधिग्रहित करण्यात आली आहे. हे अधिग्रहण करतांना शासकीय धोरणाप्रमाणे या जमिनीवरील स्थावर मालमतेची संयुक्त मोजणी करणे आवश्यक असताना ती केली गेली नाही. याउलट ५२ हेक्टर जमिनीवरील मालमत्ता नष्ट केली गेली. या उध्वस्त मालमतेची शेतकºयाच्या तक्र ारीप्रमाणे नोंद घेऊन तिचे पुनर्मूल्यांकन करावे तसेच उर्वरित १२७ हेक्टर जमीवरील स्थावर मालमतेची संयुक्त मोजणी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे केली आहे.या धरणामध्ये पूर्णपणे पाण्याखाली जाणार असलेल्या हिरडपाडा ग्रामपंचायतीतील भोतडपाडा मधील ६३ कुटुंबे विस्थापित होणार असून त्यांच्या पुनर्वसन ठिकाणी सर्व सुविधा व्हाव्यात तसेच जिल्हाधिकाºयांनी समितीला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रत्येक विस्थापित कुटुंबास १० लाखांचे स्वतंत्र पॅकेज दिले जावे. गेली १० वर्षे भोगाव्या लागणाºया मानिसक व शारीरिक यातनांना जबाबदार असलेले ठेकेदार, अधिकाºयांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणीही समितीमार्फत करण्यात आली आहे.१६ नोव्हेंबर २०१७ रोजी लेंडी धरणग्रस्त संघर्ष समितीला जिल्हा भूसंपादन अधिकाºयांनी विविध आश्वासने दिली होती व त्यांची वेळेत पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार समितीने आपले आंदोलन १५ दिवस पुढे ढकलले होते मात्र या बैठकीनंतर २५ दिवस उलटल्यानंतरही एकाही आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे हे आंदोलन छेडल्याचे समितीने म्हटले आहे.या धरणात जमीन गेलेल्या शेतकºयांना हेक्टरी २८ हजार प्रमाणे भरपाई देऊ केली. मात्र शेतकºयांंना ती मान्य नसल्याने त्यावेळी त्यांनी ती नाकारली व योग्य मोबदल्याची मागणी शासनाकडे केली होती. २०१४ ला सत्तांतर झाल्यानंतर शासनाने वाटाघाटी करून मोबदला देण्याचे धोरण निश्चित केले. त्याप्रमाणे शेतकºयांना द्यावयाचा मोबादलाही निश्चित झाला.अधिकारी व कर्मचाºयांनी जागेवर न येताच शेतकºयांच्या जमीनींच्या व त्यावरील मालमत्तांची मोजणी व नोंदी केल्या गेल्या. त्यामुळे शेतकºयांनी नाराजी दर्शविली व आंदोलनाचा मार्ग पत्करला. या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचे समितीच्या रजनी पांढरे यांनी स्पष्ट केले आहे.