शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

पालघरमधील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 12:58 AM

पीक विमा योजना : तक्रार ७२ तासांत करण्याची सुविधा उपलब्ध

बोर्डी : पालघर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे, त्यांचे पावसामुळे नुकसान झाले असल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. याकरिता पीडित शेतकºयाला ७२ तासांच्या कालावधीत नुकसानग्रस्त क्षेत्र आणि विमा भरल्याचा पुरावा मेल करायचा आहे.

कृषी विभागामार्फत शेतकºयांना याबाबत माहिती दिली जात आहे. जिल्ह्याच्या आठ तालुक्यांतील २८ मंडळांत ३० हजार ३११ शेतकºयांनी १४७६९.८५ हेक्टर क्षेत्रावर ६४ कोटी ५३ लाख ४१ हजार ६८१ रकमेचा भात, तूर आणि नागली पिकाकरिता पीक विमा काढला असून त्यामध्ये सर्वात अधिक भात पिकाचे क्षेत्र आहे. शेतकºयांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊ नये याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी त्याचा लाभ घेत आहेत. हवामान विभागाने उत्तर कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचे पूर्वानुमान दिल्यानुसार ३ आॅगस्टपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे काही भागात नदी, ओहळ आणि नाले या लगतच्या भात खाचरातील पिकांचे नुकसान झाले आहे. भात पीक विमा योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकºयांचे नुकसान झाले असल्यास त्यांनी ७२ तासांच्या आत टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन शासनाने केले आहे. याकरिता शेतकºयांचे पूर्ण नाव, पिकाचे नाव, शेत जमिनीचा सर्व्हे नंबर, पीक विमा अर्ज क्रमांक किंवा विमा भरल्याचा पुरावा आदी कागदपत्रे जोडून स्रोु८.ेंँं१ं२ँ३१ं@ ँािूी१ॅङ्म.ूङ्मे या ई-मेलवर पाठविण्यास सांगितले आहे.जिल्ह्याच्या आठ तालुक्यांतील २८ मंडळात शेतकºयांनी ३१ जुलै या अंतिम तारखेपर्यंत भात, तूर आणि नागली या पिकांकरिता ३० हजार ३११ शेतकºयांनी १४७६९.८५ हेक्टर क्षेत्रावर प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेतला आहे. तर सर्व्हर डाऊन झाल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले होते. डहाणू तालुक्यातील चिंचणी, डहाणू, कासा, मल्याण, सायवन येथील ५ हजार ४५० शेतकºयांनी विम्याचे कवच घेतले आहे. त्यामध्ये १०३२ कर्ज घेतलेले आणि ४,४१८ बिगरकर्जदार शेतकरी आहेत. त्यापैकी १९८८ शेतकºयांनी बँकेत तसेच ३,४६२ सरल सेवा केंद्रातून अर्ज भरले असून २६३४.५७ हेक्टरकरिता एकूण ११ कोटी ९७ लाख ७१ हजार ३४९ एवढी विमा रक्कम आहे. जव्हार तालुक्यातील ९७४ शेतकºयांकडून ३७६.७३ हेक्टरवर १ कोटी १२ लाख १ हजार २७५ रकमेची विमा रक्कम आहे. मोखाडा तालुक्यातील ८२१ शेतकºयांनी ४४९.८४ हेक्टरवरील ९६ लाख ९६ हजार २६७ विमा रक्कम आहे. तर पालघर तालुक्यातील ५ हजार ५६३ शेतकºयांनी २३६२.६० हेक्टरकरिता १० कोटी ७४ लाख ९८ हजार ७९ विमा रक्कम आहे. तलासरी तालुक्यातील २ हजार ८४७ शेतकºयांनी ४ कोटी ९२ लाख ६९ हजार ८४८ विमा रक्कम आहे. वाडा तालुक्यातील चार मंडळांतल्या ९ हजार ७२२ शेतकºयांनी ५१६१.५० हेक्टर क्षेत्रावर २३ कोटी ४३ लाख ८ हजार ७७८ रक्कम आहे. वसईतल्या ३६६ शेतकºयांनी ९४ लाख ६० हजार ८७ रकमेचा विमा उतरवला आहे. तर विक्रमगड तालुक्यातील ४ हजार ५६८ शेतकºयांनी १० कोटी ४१ लाख ३५ हजार ९९८ रकमेचा विमा उतरविण्यात आला आहे. 

टॅग्स :palgharपालघरFarmerशेतकरी