पालघर : मच्छीमारांच्या आयुष्यातील संघर्षाशी स्वत:ला समरस करुन आयुष्यभर लढणाऱ्या रामभाऊ पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी दिल्ली, मुंबई, रायगड आदी भागातून मच्छिमार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यात स्वातंत्र्य सैनिक जनार्दन तांबे, माजी आमदार नवनीत शहा, डॉ.विनायक उर्फ दादा परुळेकर, नॅशनल फिश फोरम चे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, दिल्लीचे मच्छिमार नेते अशोक शर्मा, मच्छीमार नेत्या पूर्णिमा मेहेर, उज्वला पाटील, ज्योती मेहेर, राजन मेहेर, ठाणे जिल्हा संघाचे चेअरमन जयकुमार भाय, अशोक नाईक, फिलिप मस्तान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.मुंबईच्या हाफिकन इन्स्टिट्यूट मध्ये आर्किटेक्ट म्हणून नोकरी करीत असतांना रामभाऊंना समुद्र खुणावत असल्याने अल्पावधीतच आपल्या नोकरीला रामराम ठोकून त्यांनी सन १९६७ साली स्वत:ची ट्रॉलर्स बोट बांधून मासेमारी व्यवसायात उडी घेतली. त्या व्यवसायात ते यशस्वी झाले नसले तरी व्यापाºयाकडून मच्छीमारांची व्यवसायात होणारी लूट रोखण्यासाठी समविचारी लोकांचा गट तयार करण्यात ते यशस्वी झाले. आणि त्यांनी आपले मासे मुंबई मार्केट मध्ये विक्रीला पाठविण्यास सुरु वात केली आणि त्यात अधिक फायदा मिळविण्यात ते यशस्वीही ठरले. या व्यवसायातील धोके, उणीवा, समस्या त्यांच्या लक्षात येऊ लागल्या. राष्ट्रदलाशी नाळ जुळलेले रामभाऊ, आपल्या मच्छिमार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी मच्छिमार नेते भाई बंदरकराच्या चळवळीशी जोडले गेले. अनेक वर्षे त्यांच्या सोबत काम केल्या नंतर भाईच्या मृत्यू नंतर रामभाऊंच्या खांद्यावर महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची मोठी जबाबदारी येऊन पडली. समस्त मच्छीमारांच्या आशा-आकांक्षा आपल्यावर अवलंबून आहेत ह्याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे पायाला चक्रे लावल्याप्रमाणे ते देशातील किनारपट्ट्याचा भाग फिरत लोकांचे प्रश्न समजून घेऊ लागले. केंद्र शासनाने २००३ साली गेट करारानुसार विदेशी बोटींना समुद्रात मुक्त मासेमारी परवानगी दिल्याच्या घोषणेने रामभाऊ अस्वस्थ झाले.अद्ययावत सामग्रीनी युक्त अशा ह्या परदेशी बोटी आपल्या समुद्रात घुसल्यास माझा मच्छिमार बांधव पार उद्ध्वस्त होऊन जाईल हा धोका त्यांनी ओळखला. आणि जागतिक नेते थॉमस कोचेरी, आणि सहकारी सातपाटीचे आ.रा. पाटील ह्यांच्या साथीने त्यांनी कफपरेड येथे आमरण उपोषणाला सुरु वात केली. अनेक दिवस चाललेल्या उपोषणाची दखल घेत सरकारला आपला आदेश माघार घेत करार रद्द करावा लागला होता.ह्या उपोषणा नंतर त्यांच्या वरचा मच्छिमारांचा विश्वास द्विगुणित झाला. त्यांनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसू लागला. आणि ‘काटेंगे भाई काटेंगे मच्छी जैसे काटेंगे’ अशा घोषणा शासनाच्या विरोधात देत हातात सुºयांची प्रतिकृती घेतलेल्या हजारो महिला आंदोलनात दिसू लागल्या.समुद्रात ओएनजीसीच्या तेल सर्वेक्षणा मुळे होणारे प्रदूषण, प्रतिबंधित भागामुळे कमी होणारे मासेमारी क्षेत्र,जाळ्यांचे होणारे नुकसान आदी कारणामुळे संतप्त झालेल्या हजारो मच्छीमारांनी २००५ साली मुंबईच्या ओएनजीसी कार्यालयाला दिलेल्या धडकेने तत्कालीन शासनकर्तेही नरमले होते.केंद्र शासनाने सन १९९१ साली सीआरझेड कायदा रद्द करून नव्याने एमिसझेड कायद्याचे नोटिफिकेशन काढले. हे मच्छिमारांच्या विरोधातील नोटिफिकेशन रद्द करण्यासाठी जागतिक नेते कोचेरी ह्यांच्या खांद्याला खांदा लावून रामभाऊ,नरेंद्र पाटील आदींनी २००८ साली जक्कु, कन्याकुमारी ते कलकत्ता असा लॉंगमार्च काढला. त्यामुळे केंद्र शासनाला हे नोटिफिकेशन रद्द करावे लागले होते. मासा वाचला तरच मच्छिमार वाचेल ह्याची जाणीव आपल्या मच्छिमार बांधवांना देऊन लहान आसाच्या जाळ्यावर बंदी घालून मासेमारी दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. पारंपरिक मच्छिमारी टिकून रहावी आणि गरिबी निर्मूलन व्हावे ह्यासाठी डब्लूएफएफपीच्या माध्यमातून देशभरातील संघटनांच्या सोबतीने युरोपमध्ये त्यांनी लढे उभारले. १९८९ साली कोचेरींसोबत जीवन वाचवा, पाणी वाचवा ह्या कन्याकुमारी येथे आयोजित आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात वसई येथील कार्यकर्ता जखमी झाला होता. हे आंदोलनही यशस्वी झाले होते. शेतकºयांप्रमाणे मच्छिमार बोटीं वापरत असलेल्या डिझेल, आॅइलवर अनुदान मिळावे ही मागणी आंदोलनातून पूर्ण झाल्याने मच्छिमार बोटधारक आजही त्याचा फायदा घेत आहेत. आज वडराई सहकारी संस्थेतील स्व.मारु तीराव मेहेर व्यासपीठावर आयोजित रामभाऊंचा देह अंत्यदर्शनासाठी ठेवला होता. त्यावेळी त्यांच्या मृत्यूमुळे मच्छिमार समाजाची न भरून येणारी हानी झाल्याच्या भावना अनेक वक्त्यांनी व्यक्त केल्या.मच्छीमारांच्या विकासाचा,त्यांच्या उन्नतीचा सतत विचार करणारे व्यक्तिमत्व हरपले.- नवनीत शहा, माजी आमदार
संपूर्ण देशातील किनारपट्टीवर दु:खाचे सावट ओढवले असून त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांची अपुरी कामे पुढे नेणार.- अशोक शर्मा, मच्छिमार नेते, दिल्ली