शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

सा.बां.ची लाटली कामे

By admin | Published: July 08, 2016 3:36 AM

वाडा तालुक्यात ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक अरुण ठाकरे यांनी आपल्या स्वत:च्या मर्जीनुसार नियमबाह्यपणे सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध कामांचे वाटप करून शासनाचे

- वसंत भोईर, वाडा

वाडा तालुक्यात ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक अरुण ठाकरे यांनी आपल्या स्वत:च्या मर्जीनुसार नियमबाह्यपणे सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध कामांचे वाटप करून शासनाचे ई टेंडरींग धोरण धाब्यावर बसविले आहे.शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागातील कामांमध्ये पारदर्शकता यावी म्हणून ३ लाख अंदाज पत्रकीय रकमेपेक्षा अधिक रकमेच्या कामांना इ टेंडरिंग आवश्यक केले आहे. या सरकारच्या निर्णया आधी हे काम वाटप जिल्हा मजूर फेडरेशन करीत असे परंतु ई टेंडरिंगचे धोरण लागू झाल्या पासून मजूर फेडरेशनचे महत्व कमी झाले आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक अरुण ठाकरे यांनी आपले महत्व टिकावे म्हणून स्वतंत्र वाडा तालुका ठेकेदार संघटना स्थापन करून तिच्या नावाखाली सार्व जनिक बांधकामच्या कामांचे वाटप सुरू केल्याने शासनाचे धोरणच धाब्यावर बसविले गेले आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन.एस.पालवे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. दरम्यान श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता अशा प्रकारे काम वाटप करणे ही एकाधिकारशाही आहे त्यामुळे तालुक्यातील विकास कामांची गुणवत्ता ढासळली असून शासनाच्या ई टेंडरिंग धोरणाची पायमल्ली होत आहे. यात ठराविक ठेकेदारांचे हितसंबंध गुंतले असून ही बेकायदेशीर प्रक्रि या सार्वजनिक बांधकाम खात्याने बंद केली नाही तर या विरोधात श्रमजीवी संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असे सांगितले. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनाही साकडे घातले जाणार असल्याचे समजते.शासनाच्या धोरणाला टाकले ‘खिशात’शासनाने ई टेंडरिंगच्या माध्यमातून कामांची निविदा प्रक्रि या करतांना स्पर्धा व्हावी व त्यातून कामांची गुणवत्ता राखून पारदर्शकता यावी असा प्रयत्न केला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्यातील अरुण ठाकरेसारख्या मोठया ठेकेदारांनी संगनमत करून ही कामे आपसात वाटून घेतली आहेत. त्यामुळे ई टेंडरिंग प्रक्रीया केवळ कागदांवर दाखवून स्पर्धा भासविली जात आहे. ज्या ठेकेदाराला ठाकरेंनी कामाची शिफारस दिली आहे तो आवश्यक तीन एजन्सी कागदोपत्री दाखवून निविदा प्रक्रि या पूर्ण करीत आहेत मात्र प्रत्यक्षात जी स्पर्धा होणे अपेक्षित आहे ती होतांना दिसत नसल्याचे उघड होत आहे. अशा पद्धतीने कामांच्या वाटपाचे फेडरेशनचे संचालक अरुण ठाकरे यांना कोणतेही अधिकार नसतांना ते ही उचापत कोणाच्या आशीर्वादाने करीत आहेत.वाडा तालुक्यात सुमारे १५० कोटीहून अधिक रकमेची कामे मंजूर असून या कामांचे वाटप अरुण ठाकरे स्वत: शिफारशी देऊन करीत आहेत. ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे काम वाटपाचे अधिकार कमी झाल्याने ठाकरेंनी ठेकेदार संघटनेच्या नावाखाली स्वत:चे सत्ताकेंद्र निर्माण करीत आहेत. यामागे त्यांचे हितसंबंध गुंतल्याचे बोलले जात आहे.