अनिरुद्ध पाटील, बोर्डीदरवर्षीप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात कोल्हापूरहून आलेल्या कडकलक्ष्मीचे आगमन डहाणू तालुक्यातील खेडोपाड््यात झाले आहे. तिचे भक्तीभावाने आशिर्वाद घेणाऱ्या सुवासिनी आणि या पथकाच्या मागोमाग गावभर फिरणाऱ्या लहान मुलांचा ताफा बघून आधुनिक काळातही ग्रामसंस्कृतीत परंपरागत सांस्कृतिक ठेव्याचे महत्व तसूभरही कमी झाला नसल्याची प्रचिती येते.मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी महालक्ष्मी व्रतांचा प्रारंभ होतो. या काळात डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात भक्तांची गर्दी दिसून येते. कोल्हापूरहून कडकलक्ष्मी याच काळात येते. या परिसरातील गावामध्ये ढोलके घुमवित उघड्या पाठीवर चाबकाचे फटकारे मारुन घेणाऱ्या पोतराजासह कडकलक्ष्मीचे आगमन झाले आहे. लक्ष्मीचा मुखवटा घेतलेली महिला गल्ली बोळातील घरोघरी फिरुन भक्तजनांना आशिर्वाद देत असते सुवासिनी तिची भक्तीभावाने पूजा करीत असतात. हे दृष्य पाहून अनेक पिढ्या बदलल्या. मात्र गावगाडा पूर्वी सारखाच चालत आल्याचे बुजुर्ग महिलांनी सांगितले.खडोपाड्यात आधुनिकतेचा शिरकाव झाला आहे. देवावरील श्रद्धा आणि व्रताचे पालन करण्याची पद्धती बदलली परंतु काळानुरुप थोड्याफार फरकाने परंपरा कायम असल्याचे चिखले गावातील स्नेहल पाटील यांनी म्हटले आहे. या पथकासह सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही.कडकलक्ष्मीनेही काळानुरुप बदल केल्याचे प्रकर्षाने दिसून आले. पारंपारिक घुमण्याऐवजी, नव्या पद्धतीची ढोलकी वापरली जात असून वेषभूषाही बदलली आहे. कुटुंबाची आर्थिक घडी बसविण्याकरीता लहानमुलांनाही पोतराज बनवून चाबकाचे फटकारे मारुन घ्यावे लागत असल्याचे वास्तव कोल्हापूरहून आलेल्या कडकलक्ष्मीच्या भक्त महिलेने कबूल केले.मार्गशीर्षात महालक्ष्मी व्रताचे पालन केले जाते. या काळात कोल्हापूरात जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेणे सर्वांनाच शक्य नाही. परंतु कडकलक्ष्मी पथकाच्या माध्यमातून हे भाग्य लाभते.- सौ. अर्चना पंकज पाटीलचिखले गावातील महिला.
बोर्डीत कडक लक्ष्मीचे आगमन
By admin | Published: December 14, 2015 12:39 AM