शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

'हिंदू धर्मासारखा उदार धर्म जगात दुसरा नाही'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 11:57 PM

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे गौरवोद्गार; आपला देश सकल धर्माचे माहेरघर

पालघर : हिंदू धर्मासारखा उदार धर्म जगात दुसरा कुठेही नसेल, अशी त्याची महती असल्याचे सांगून सर्वांना सामावून घेण्याची शक्ती या धर्मात असल्याने आपला देश सकल धर्माचे माहेरघर आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांनी माहीम येथे काढले.माहीम शिक्षण संस्था व भुवनेश कीर्तने महाविद्यालयाच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त रविवारी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्य अतिथी म्हणून दिब्रिटो बोलत होते. या वेळी माजी राज्यपाल राम नाईक, ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, खा. राजेंद्र गावित, आ. चिंतामण वणगा, जयवंत सावे, जगन्नाथ राऊत, संस्था अध्यक्ष अनंत पाटील आदी उपस्थित होते.वसई ही सर्व धर्म मैत्रीची एक प्रयोगशाळा असून समाजाला एकत्र करून पुढे नेण्यासाठी त्यांची प्रगती करण्यासाठी धर्माची उभारणी करण्यात आल्याचे सांगून विशेषत: भारतीय धर्म त्यात असल्याचे सांगितले. आपला देश सकल धर्माचे माहेरघर असल्याने सर्वांना सन्मानाने जगता येते. संस्कृतीप्रमाणे वागता येते. सर्व धर्माला समान हक्क हे घटनेने मान्य केले असून हे जगापुढे आदर्श असल्याचेही ज्येष्ठ साहित्यिक दिब्रिटो यांनी सांगितले, तर शिक्षणाने संस्कारित होणे महत्त्वाचे असल्याचे सांगून पालकांचा आपल्या पाल्यांना इंग्रजी शिक्षण देण्याकडे कल दिसून येत आहे. मात्र प्रत्येक शाळेत मातृभाषेतून शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, असे राम नाईक यांनी सांगितले.रोपट्याचे वटवृक्षात रूपांतरएका थोर विचारसरणीतून भुवनेश कीर्तने महाराजांनी शाळेची स्थापना केली. एका छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होत आज शाळेत १ हजार ८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, असे राम नाईक यांनी सांगितले.