शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

२८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी; दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:22 PM

जिल्हा बँकेचा पुढाकार; बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी

- सुरेश लोखंडे ठाणे : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या कर्जमाफीला ठाणे व पालघर जिल्ह्यातील २८ हजार ३९५ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यांना १६८ कोटी ५९ लाख १४ हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार असून यासाठी बायोमॅट्रिक पद्धतीने शेतकºयांची पडताळणी करण्यात येत आहे. सोमवारी दोन्ही जिल्ह्यांतील चार सेवा सोसायट्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रमाणीकरणाच्या पडताळणीचा प्रारंभ झाला.या आॅनलाइन पडताळणीसाठी शेतकºयांना कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवू नये यासाठी राज्य शासनाच्या आदेशास अनुसरून बँकेने ठाणे व पालघर दोन्ही जिल्ह्यात बायोमॅट्रिक यंत्रणा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने उपलब्ध करून दिली आहे. शेतकºयाचे आधारकार्ड, अंगठ्याचा ठसा घेऊन बँक खाते पडताळणी केली जात आहे. त्यानंतर मिळणारा एक कोडनंबर आॅनलाइन नोंद केल्यानंतर शेतकºयास किती रकमेचे कर्ज माफ झाले. ती रक्कम त्त्वरीत दिसेल.ती मान्य असल्यास शेतकºयाने एस म्हणावे, मान्य नसल्यास नो म्हणायचे. नो म्हटल्यानंतर त्त्वरीत ती तक्रार जिल्हा कमिटीकडे नोंद होऊन त्याच दिवशी कमिटी निर्णय घेऊन शेतकºयास न्याय देणार असल्याचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व सीईओ राजेंद्र दोंदे यांनी लोकमतला सांगितले.16,331 ठाणे जिल्ह्यातील पात्र शेतकºयांच्या याद्या २८ फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध होती. त्यांची ९६ कोटी ६० लाखांची कर्जमाफी होणार असल्याचे असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.चार ठिकाणांहून प्रारंभशेतकºयांना कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी बायोमॅट्रिक पद्धतीने कामकाज सोमवारी सुरू झाले आहे. यासाठी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधील आंबरापूर सेवा सोसायटी तर मोखाडा येथील असेगाव सेवा सोसायटी या दोन ठिकाणी आणि ठाणेच्या शहापूरमधील धसई आणि अस्रोली येथील सेवा सोसायटीमध्ये प्रथम प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकºयांच्या याद्या आल्या आहेत.येथे लावणार पात्र शेतकºयांच्या याद्याअसनोली येथील १९२ तर धसई येथील ४९ पात्र शेतकºयांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जाणार आहे. या याद्यामध्ये काही त्रृटी आढळल्यास त्यांची त्या-त्या स्तरावर निर्गती केली जाणार आहे. जिल्ह्यातील पात्र थकबाकीदार शेतकरी सभासदांच्या नावाच्यायाद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेत लावल्या जाणार आहे.पालघरमधील १२ हजार शेतकरीपालघर जिल्ह्यातील १२ हजार ५८४ शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरले असून त्यांना ७४ कोटी एक लाख ८४ हजार रुपये कर्जमाफी मिळणार आहे. यात ६१ कोटी १५ लाख ८७ हजार रुपयांची मुद्दल व त्यावरील व्याज १२ कोटी ८५ लाख ९६ हजार रुपये आहे. मुद्दल व व्याज मिळून पालघर जिल्हह्यातील या पात्र शेतकºयांचे ७४ कोटी एक लाख ८४ हजारांचे कर्जमाफ होईल. यामध्ये सर्वाधिक वाडा तालुक्यातील तीन हजार ६८८ शेतकºयांचे २४ कोटी ६७ लाखांचे कर्ज माफ होईल. तर याखालोखाल पालघर तालुक्यातील एक हजार ९७१ शेतकºयांचे ११ कोटी ७६ लाख ६२ हजार, डाहाणूमधील एक हजार ७०० शेतकºयांचे नऊ कोटी ७३ लाख ४० हजार, वसईचे २३१ शेतकºयांचे एक कोटी ७५ लाख ९६ हजार, तलासरीचे एक हजार ४७ शेतकºयांचे सात कोटी ७३ लाख ७५ हजार, मोखाडामधील एक हजार ७८६ जणांचेसहा कोटी एक लाख पाच हजार, जव्हारमधील एक हजार ५३ शेतकºयाचे चार कोटी ७८ लाख ८६ हजार, विक्रमगडमधील एक हजार १०६ शेतकºयांचे सात कोटी ५५ लाख १४ हजारांचे कर्जमाफ होणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी