शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
2
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
3
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
4
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
5
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
6
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
7
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
8
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
9
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
11
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
12
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
13
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
14
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
15
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
16
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
17
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
18
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
19
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
20
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल

Lockdown News: खलाशांपाठोपाठ १५ हजार वीटभट्टी मजुरांची आर्त हाक; गुजरात सीमेवर अडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 6:13 AM

डहाणू-तलासरीतील कामगारांचे साकडे

शौकत शेख 

डहाणू : ‘कोरोना’मुळे लॉकडाउन जाहीर झाल्याने गुजरातमध्ये अडकलेल्या जवळपास १० हजारांहून जास्त खलाशांची सुटका झाल्यानंतर आता वीटभट्टी मजुरांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यातून गुजरात राज्यात वीटभट्टीवर स्थलांतरित झालेले जवळपास १५ हजार वीटभट्टी मजूर गुजरातच्या सीमेवर अडकले असून आपल्या गावाकडे परतण्याची त्यांना ओढ लागली आहे.लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे दीड महिन्यापासून हे मजूर गुजरात सीमेवर ठिकठिकाणी अडकले असून उपासमारीचा सामना करीत आहेत. त्यांना आपल्या गावाकडे येण्याची ओढ असून हातावर पोट असणारे हे मजूर कच्च्याबच्च्यांसह सरकारकडे आर्त विनवण्या करीत आहेत.

डहाणू आणि तलासरी तालुक्यातील कैनाड, गंजाड, कोसबाड, झाई, अस्वाली, बोर्डी, वधना, कासा, चारोटी, दापचरी, गांगणगाव, वेवजी, वाकी, तलासरी अशा अनेक गावांतील हजारो मजूर भातकापणीनंतर आॅक्टोबरमध्ये कुटुंबासह गुजरात राज्यातील संजाण, भिलाड, खतलवाडा, करंबेली, वापी, बलसाड, वासदा, नवसारी, सुरत, चिखली अशा ठिकाणी आठ महिन्यांसाठी वीटभट्टीच्या कामावर स्थलांतरित होतात. त्यामुळे या कालावधीत जंगलपट्टी भागातील गावेच्या गावे ओस पडतात. याची कोणत्याही ग्रामपंचायतीकडे नोंद नसते. हे स्थलांतरित मजूर मे महिन्यात गावाकडे परतत असतात.

कोरोनामुळे यंदा तेथील वीटभट्ट्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे हे मजूर तेथे अडकून पडले. त्यातच हातातील पैसेही संपले असल्यामुळे या मजुरांना उपासमारही सहन करावी लागत आहे. संजाण, भिलाड येथील मजूर चालत गावी आले, तर गुजरात राज्यातील सीमा तेथील सरकार ओलांडू देत नसल्यामुळे काही मजूर तेथेच सीमेवर अडकले आहेत. याबाबत कैनाड ग्रा.पं. सरपंचांनी सहायक जिल्हाधिकारी डॉ. सौरभ कटियार यांना पत्र पाठवून त्यांना आणण्याची मागणी केली आहे.८० खलाशांसह आणखी एक बोट समुद्रात : गुजरात राज्यातील बंदरांत खलाशी म्हणून गेलेल्या आणि लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या १२ हजार खलाशांना डहाणू बंदरात यापूर्वीच उतरविण्यात आले असून त्यांच्यात्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे. मात्र, आणखी एक बोट ८० खलाशांना घेऊन मंगळवारी डहाणू बंदरात दाखल झालेली आहे. या बोटीतील खलाशीही डहाणू बंदरात उतरविण्याच्या प्रतीक्षेत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस