सुरेश काटे, तलासरीतलासरी नाक्यावर उधवा तलासरी रस्त्यावर पुलाचे काम सुरू असून सोमवारी रात्री खोदकाम करताना ठेकेदाराच्या मनमानी कामाचा फटका तलासरीतील दूरध्वनी ग्राहकांना बसला. चारशे व पन्नास पेअरच्या दोन केबल खोदकाम करणाऱ्या पोकलनने तोडल्याने तलासरीतील दोनशे दुरध्वनी बंद पडले तर उधवा दुरध्वनी केंद्रही बंद पडले. पण याचे सोयरसुतक ना दुरध्वनी विभागाच्या अधिकाऱ्यांना ना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना.पुलाच्या कामाचे खोदकाम करताना जमिनीखालून जाणाऱ्या केबलचे नुकसान होऊ नये यासाठी वास्तविक बांधकाम खात्याने संबंधीत खात्याना कळविणे आवश्यक असते पण तसेच न केल्याने व पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने काळजीपूर्वक खोदकाम न केल्याने दुरध्वनीची चाररशे पेअरची केबल तुटली.दुरध्वनी विभागाने महत्वाच्या मोठ्या केबल टाकताना जमिनीखाली ५ फूट तसेच रस्त्यापासून १५ मीटर दूर वरून केबल टाकणे आवश्यक असताना दूरध्वनीची तुटलेली केबल ही फक्त तीन फुट खोल व रस्त्यालगत टाकल्याने पुलाचे खोदकाम करताना तुटली. नियमानुसार दुरध्वनी केबल न टाकल्याने दुरध्वनी विभागाच्या कंत्राटदाराच्या मनमानीचा फटका ग्राहकांना बसला व सरकारचेही लाखो रू. चे नुकसान झाले. तुटलेली केबल दुरूस्त करण्यास दुरध्वनी विभागाचे अधिकारी चालढकल करीत असल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे.
तलासरीचे दूरध्वनी केबल तुटल्याने बंद
By admin | Published: February 03, 2016 2:06 AM