Lok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड, मतदारांचा खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 07:19 AM2018-05-28T07:19:30+5:302018-05-28T15:05:24+5:30
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. येथील १८ लाख मतदार निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण ७ उमेदवारांपैकी कोणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पालघर/ भंडारा - पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण ७ उमेदवारांपैकी १८ लाख मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. श्रीनिवास वनगा (शिवसेना), राजेंद्र गावित (भाजपा), दामू शिंगडा (काँग्रेस), बळीराम जाधव (बविआ), किरण गहला (मार्क्सवादी) यांच्यामध्ये मुख्य पंचरंगी लढत आहे. २०९७ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पोटनिवडणुकीकरिता १२ हजार ८९४ कर्मचारी, तसेच ४ हजार २१९ सुरक्षा कर्मचारी तैनात असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. २०९७ केंद्रांपैकी १४ केंद्रे संवेदनशील असून, या केंद्रांकडे शासकीय यंत्रणेचे अधिक लक्ष राहणार आहे.
भंडारा-गोंदियात आघाडी आणि भाजपात मुख्य लढत
भंडारा-गोंदिया येथे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे हेमंत पटले व आघाडीचे मधुकर कुकडे यांच्यात मुख्य लढत होत आहे. ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
LIVE UPDATES
-पालघर पोटनिवडणूक : ईव्हीएमऐवजी बॅलट पेपर वापरा, खा. अनिल देसाई यांची मागणी
- पालघर पोटनिवडणूक : दुपारी एक वाजेपर्यंत 19.25% मतदान!
- भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : EVMच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची पत्रकार परिषद
- भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय : खासदार प्रफुल्ल पटेल
- भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : ईव्हीएमऐवजी पुन्हा मतपत्रिका वापरण्याची मागणी समोर येत आहे : खासदार प्रफुल्ल पटेल
- भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : ईव्हीएममधील बिघाडांच्या तक्रारीबाबत गांभीर्याने विचार व्हावा : खासदार प्रफुल्ल पटेल
- भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : अनेक मतदान केंद्रांवर फेरमतदान घ्यावं लागेल : खासदार प्रफुल्ल पटेल
- भंडारा-गोंदियात कुठेही मतदान रद्द केलेलं नाही, निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांची माहिती
Technical problems in EVMs&VVPATs clearly indicate failure of EC.If this is the situation in by-polls, think about coming Lok Sabha Elections. We've said it again & again & other parties have also agreed,that elections should be conducted using ballot papers:Anil Desai, Shiv Sena pic.twitter.com/bpaoLJALw5
Bhandara–Gondiya Lok Sabha by polls: Voting temporarily suspended for now at 35 polling booths due to faulty Electronic Voting Machines (EVM): Abhimanyu Kale, District Magistrate #Maharashtra
— ANI (@ANI) May 28, 2018
(Palghar bypoll 2018 : पालघरचे गोरखपूर होईल, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका)
- पालघर पोटनिवडणूक - वसई निर्मळ येथील माळी आळी, मावंडा, नवाले, नंदनवन या चार गावांचा मतदानावर बहिष्कार, स्थानिक समस्यांनी त्रस्त नागरिक सर्वच राजकीय पक्षांवर नाराज, दीड हजार मतदारांचा मतदानावर बहिष्कार
- पालघर : तारापूर, शेलवाली, कमारे, सातपाटी, मायखोप, धुकटण, चिंचणसह अनेक मतदान केंद्रावरील EVM बंद पडल्याने मतदारांचा खोळंबा
- पालघर लोकसभा पोटनिवडणूक- सकाळी 11 वाजेपर्यंत 10.27 टक्के मतदान.
(२५ टक्के ईव्हीएम मशीन्स एकाएकी कशा काय बिघडतात? प्रफुल्ल पटेल यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार)
- पालघर : जव्हार दादरकोपरा बुथवरील ईव्हीएम वोटिंग मशीन गेल्या तासभरापासून बंद. तासभर मतदारांचा खोळंबा.
- पालघर पोटनिवडणूक : सकाळी 9 पर्यंत 7 टक्के मतदान.
- पालघर लोकसभा पोटनिवडणूक : विरार पश्चिमेकडील विद्याविहार शाळेतील EVM गेल्या दीड तासापासून बंद, मतदार त्रस्त.
- पालघर लोकसभा पोटनिवडणूक : ईव्हीएममध्ये हेराफेरी करत असल्याचा उमेदवार बलिराम जाधव यांचा आरोप. वसई पूर्व आडणेतील निवडणूक अधिकारी अडचणीत. बलिराम जाधवांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार.
#Palghar Lok Sabha by-poll: Instead of index fingers, middle fingers of some voters are being inked by officials to differentiate between them, as Panchayat elections were held in some parts of Palghar yesterday. #Maharashtrapic.twitter.com/hbTK1wvLpL
Maharashtra: 11 faulty EVMs reported across polling booths in Gondiya & Bhandara Lok Sabha constituencies
- पालघर लोकसभा पोटनिवडणूक : ईव्हीएममध्ये हेराफेरी करत असल्याचा उमेदवार बलिराम जाधव यांचा आरोप. वसई पूर्व आडणेतील निवडणूक अधिकारी अडचणीत. बलिराम जाधवांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार.
- भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक : सकाळी 9 वाजेपर्यंत पाच टक्के मतदानाची नोंद
- पालघर : भाजपाकडून मतदारांना प्रलोभन देत असल्याची ऑडिलो क्लिप व्हायरल. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन नाईकांच्या ऑफिसमधून फोन.
- प्रभोलभन दाखवण्याची भाजपाला आवश्यकता नाही, राजन नाईक यांनी आरोप फेटाळले
Maharashtra: Voting has not started at polling booth number 170 in Arjun-Morgaon area of Gondiya, due to faulty EVM
- भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.
08:07 AM :पालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर
- पालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.
- पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत नव्याने EVM आणि VVPAT मशीनचा वापर करण्यात येत असताना तालुक्यातील मतदान केंद्रावर मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे मतदान सुरू झाले नसल्याने मतदानाचा वेळ फुकट जात असून वेळ वाढवून मिळावा, अशी मागणी केली जात आहे.
- पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.
- पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.
#PalgharLoksabhabyelection: People outside a polling booth in Palghar pic.twitter.com/sdbOYadeHj
— ANI (@ANI) May 28, 2018