शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

पालघर लोकसभा निवडणूक निकाल 2019: राजेंद्र गावित की बळीराम जाधव कोणाचा होणार विजय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 10:54 AM

पालघर लोकसभा निवडणुकीकडेही निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. यंदा पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून राजेंद्र गावित निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

वसई-विरारः पालघर लोकसभा निवडणुकीकडेही निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. यंदा पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून राजेंद्र गावित निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांचं आव्हान आहे. बळीराम जाधव यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंही पाठिंबा जाहीर केला असल्यानं इथली लढत चुरशीही झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, पालघर मतदारसंघात 20व्या फेरीनंतर राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना आतापर्यंत 150944 मतं मिळाली असून, बहुजन विकास आघाडीच्या  बळीराम जाधव यांच्या पारड्यात 136552 मतं पडली आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार चिंतामण वनगा इथून निवडून आले होते. त्यांनी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांचे निधन झाल्यानंतर या रिक्त झालेल्या जागेवर 2018मध्ये पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत शिवसेनेनं चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली होती.तर भाजपाकडून राजेंद्र गावित निवडणुकीच्या रिंगणात होते. त्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या राजेंद्र गावित यांना 2 लाख 72 हजार 782 मतं मिळाली होती, तर शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांना 2 लाख 43 हजार 838 मतं मिळाली होती. त्यानंतर शिवसेना आणि भाजपानं लोकसभा निवडणुकीत आघाडी केल्यानं तो मतदारसंघ शिवसेनेनं भाजपाकडून मागून घेतला आणि तिथून भाजपाचे खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेच्या धनुष्यबाणावरून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. परंतु यंदा  पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीने बळीराम जाधव यांना काँग्रेस-राष्ट्रवादीनं पाठिंबा दिल्यानं त्यांची ताकद वाढली आहे. बळीराम जाधव हे 2009चे पालघरचे खासदार आहेत.

टॅग्स :palghar-pcपालघरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९