वाडा : वाडा-मनोर महामार्गावरील ठाणगेपाडा येथे एका दास्तान डेपोवर सापडलेल्या अवैैध लाकूडसाठा प्रकरणी वनपालास निलंबित करण्यात आले आहे. मात्र, त्यास तेवढेच जबाबदार असलेल्या वनक्षेत्रपालावर कारवाई करण्यात आली नव्हती. लोकमतने या प्रकरणी सतत पाठपुरावा केला होता. या अनुषंगाने प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी ठाण्याच्या मुख्य वनसंरक्षकांना याबाबत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुख्य वनसंरक्षकांनी वनक्षेत्रपाल एच व्ही सापळे यांना निलंबित केले.
वाडा मनोर महामार्गावरील ठाणगेपाडा येथे असलेल्या एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा साठा असल्याची खबर दक्षता पथकाला मिळाली होती. त्यानंतर त्यांनी ११ जुलै २०१८ रोजी सायंकाळी डेपोवर धाड टाकली. या धाडीत लाकडाचा साठा जास्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी स्थानिक वनक्षेत्रपाल एच. व्ही .सापळे यांना कारवाई करण्याची सुचना केली. त्यानंतर तब्बल नऊ दिवसांनी सापळे यांनी तो दास्तान डेपो सील करून २० जुलै २०१८ पासून कारवाई करण्यास सुरु वात केली. या प्रकरणी या दास्तान डेपोचे मालक सुनिल आंबवणे, राजू शिलोत्री व रमेश पाटील या तिघांवर वन नियमावली २०१४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.एस.पाटील हे गेल्या महिन्यात येथील वनविभागाच्या कार्यालयाला भेट दिली होती.या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यात कोणाचीही गय केली जाणार नाही.- राजेंद्र कदम,मुख्य वनसंरक्षक (प्रा.) ठाणे वनवृत्तवरील तीनही आरोपींची वाडा न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली असून पुढील तपास वाडा पश्चिम परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल एच व्ही सापळे हे करीत होते. मात्र सदरचा विनापरवाना लाकडाचा साठा त्यांच्याच कार्यक्षेत्रात सापडल्याने व त्यांनी तपासात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून वरिष्ठांनी त्यांच्याकडून तपास काढून त्यासाठी त्रिसदस्य समिती नेमण्यात आली आहे.