- हुसेन मेमनजव्हार - पालघर लोकसभा निवडणूकीमध्ये युतीच्या माध्यमातून ही जागा शिवसेना लढवणार हे जवळपास निश्चित झाले असून लवकरच तशी घोषणाही होण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे सेनेला आव्हाण नेमका कोणता पक्ष देणार असा सवाल उपस्थित होत असून पालघर लोकसभेची महाआघाडीची बरीचशी गणिते आता दिंडोरी मतदारसंघावर ठरणार असून काहिही झाले तरी दिंडोरी लढणारच या सीपीएमच्या दाव्यामुळे जर ही जागा महाआघाडीत सीपीएम गेली नाही तर मात्र पालघरात सीपीएम स्वबळावर लढण्याची चिन्हे आहेत. अर्थातच पालघरात महाआघाडीत बिघाडीची चिन्हे निर्माण झाली आहेत. याचा फायदा सेनेला किती होईल हे आगामी दिवसात कळेलच.सेनेची योजना पक्की असली तरी पालघरातील महाआघाडीच मात्र अजूनही जमताना दिसत नसले तरी ही जागा कॉंग्रेस बविआ ला देवून येथे महाआघाडीकडून बविआ लढण्याची दाट शक्यता आहे. मात्र सीपीएमचा तिढा अद्याप सुटला नसल्याने दिंडोरी लोकसभा मतदरसंघावर त्यांनी दावा केला असून महाआघाडीतुन ही जागा न दिल्यास सीपीएम स्वतंत्र लढणारच अशी माहीती राज्य समन्वय समितीचे सचिव डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात असून या जागेवर लढण्यासाठी राष्ट्रवादीकडे मातब्बर उमेदवार आहेत. याशिवाय नुकतेच सेनेचे माजी आमदार धनराज महाले यांचेही पुनर्वसन येथे होवू शकते यामुळे राष्ट्रवादी ही जागा सोडेल का याबाबत साशंकता आहे. याचाच इफेक्ट पालघरात होऊन आघाडीला धक्का देण्यासाठी कदाचित सीपीएम स्वतंत्र लढू शकते यामुळे जिल्ह्यातील ७० ते ८० हजाराहून अधिकची वोटबॅँक असलेली सीपीएमची मते आघाडीच्या उमेदवाराला मिळणार नाहीत त्यामुळे त्यांचा दावा कमजोर पडताना दिसत आहे. त्या राज्यभर महा आघाडीत झालेल्या घोळा प्रमाणेच थेट दिंडोरीचा इफेक्ट पालघरात होवु शकतो. एकुणच शिवसेना भाजपाच्या एकुण मतांचा आकडा मोठा आहे तर दुसरीकडे नुसत्या बविआ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची मतांची आकडेवारी जवळपास पोहचणारी आहे. यामुळे सीपीएमची मते जोडणे हे विजयासाठी आवश्यकच आहे. त्यातच मध्यंतरी सेना भाजपाची मोठ्याप्रमाणावर दुभंगलेली मने या ठीकाणी महाआघाडीच्या उमेदवाराला फायदेशीर ठरू शकतात त्यामुळे महाआघाडी यशस्वी करताना आता पालघर आणि दिंडोरी यांचा परस्पर तिढा वरीष्ठ पातळीवरु न कसा सोडवणार हे येणारा काळ सांगेल.
महाआघाडीची गणिते दिंडोरीच्या तडजोडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 3:50 AM