शशिकांत ठाकूरडहाणू/कासा : मुंबई-अहमदाबाद महामार्गालगाता चारोटीजवळ डहाणू रेल्वे स्टेशनापाासूना २६ कि.मी. अंतारावर विवळवेढे येथे पा्रसिध्द श्र्री महालक्ष्मी मातेचे मंदिर आहे. ते शेकडो वर्षापासून भाविकांचे श्रध्दास्थान आहे. ही देवी जागृत असून नवसाला पावते असा भाविकांचा दृढ विश्वास आहे. त्यामुळे या मंदिराता भाविकांची सतत गर्दी असते. तिचा मोठा उत्सव चैत्रात होतो.निरनिराळया रंगसंगतीने मंदिर रंगवून अधिक आकर्षित केले आहे. येथील पुजारी हे आदिवासी समाजाचे आहेत. लकांत ही देवी कोळवणची महालक्ष्मी म्हणून प्रसिध्द आहे. वर्षभरात या देवीचे चैत्र पौर्णिमा उत्सव, नवरात्रोत्सव, वाहा बरसी उत्सव हे तीन उत्सव होतात. चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून पंधरा दिवस देवीची यात्रा भाविकांसाठी आकर्षण ठरते. या यात्रेला मोठया संख्येने महाराष्ट्रासह गुजरात मधील भाविक येतात. ऐतिहासिक नोंद अकबर बादशहाच्या वेळी राजा तोरडमल येथे आला होता. त्याने दवीचे दर्शन घेतले अशी इतिहासात नोंद आहे. तसेच पंजाबचा राजा रणजित सिंह यांनी पंजाब सर केल्यावर देवीची महापूजा करून मंदिरावर सोन्याचा कळस चढविला होता. असा इतिहासाचा दाखला आहे. महालक्ष्मी मातेच्या अनेक अख्यायिका असून देवी डहाणूला स्थायिक कशी झाली याबाबत असे सांगितले जाते की, कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गुजरातमध्ये वास्तव करण्याची इच्छा झाली असता, वाटेत विवळवेढे डोंगर दऱ्यातुन जात असताना विश्रांतीची गरज भासू लागली व विश्रांतीसाठी देवी मूसळया डोंगराच्या शिखरावर गेली व पूढे देवीस भक्तांची आवश्यकता वाटली. येथील कान्हा ठाकूर नावाच्या भाक्तास देवीने दृष्टांत देवून पूजा करण्यास सांगितले. पुढे ते मोठया श्रध्देने डोंगरावर जाऊन पूजा करू लागले आणि पूढे देवी विवळवेढे येथे स्थयिक झाली. तेथेही आता मंदिर उभारण्यात आले आहे. या डोंगरावर चढण्यास डहाणूपासून १८ कि.मी.आणि चारोटीपासून ६ कि.मी. अंतरावर वधना गावातून गडावर जाण्यास पायऱ्यांचा रस्ता आहे. साधारण ९०० पायऱ्या चढून गडावरील मंदिराजवळ जावे लागते.
नवसाला पावणारी डहाणूची महालक्ष्मी
By admin | Published: October 10, 2016 3:13 AM