- शशिकांत ठाकूरकासा - डहाणूची प्रसिद्ध महालक्ष्मीदेवीची यात्रा चैत्र पौर्णिमा १९ एप्रिलपासून सुरू झाली असून सतत पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेचे आता शेवटचे दोन दिवस राहिले आहेत. आता पर्यंत सुमारे ८ लाख भाविकांनी यात्रेमध्ये हजेरी लावली असल्याचे मंदिर संस्थाचें अध्यक्ष संतोष देशमुख यांनी लोकमतला सांगितले.प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रेत दरवर्षी पालघर, ठाणे, मुंबई बरोबर गुजरात राज्यातून लाखोंच्या संख्येने नागरिक येतात. यामध्ये देवीच्या दर्शनाबरोबर विविध प्रकारच्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी असते यात्रे प्रसाद, पेढे, मिठाई, खेळणी अशा दुकानाबरोबर पाळणे, झुले, मौत का कुवा, सर्कस, जादूचे खेळ असे विविध मनोरंजन खेळ त्याच बरोबर, घरगुती वापराच्या वस्तू, कांदे, बटाटा, लसुण, मसाल्याची दुकाने आहेत. यात्राकाळामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध असलेल्या भुजिंगची तिनशे दुकाने आहेत. शिवाय पेढ्याची ५०, मिठाईची ३०, प्रसाद ाची ३०, हारफुलें ४० दुकाने लावण्यात आली आहेत. अबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी मौत का कुआ, सर्कस, विविध आकाश पाळणे अशी १० दुकाने, कांदे, बटाटा, लसूणआदी जिन्नसांची ५०, सुकी मच्छी (खार) ४० त्याच प्रमाणे खेळणी, खाद्यपदार्थ, विविध प्रकारच्या वस्तूंची ४०० अशी एक हजारांपेक्षा जास्त दुकाने मांडली आहेत.महाराष्ट्र बरोबर गुजरात, सेलवास, झारखंड, उत्तरप्रदेश अशा परराज्यातील दुकानदारांचा समावेश मोठ्याप्रमाणातआहे. पाळणे,सर्कस आदी मनोरंजनाचे तंबु झारखंड, भरु च येथून येतात.उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध पाथरूड येथील यात्रेत सर्व पेढे दुकानदार येत असून चालू वर्षी झाल्याने पेढे उत्पादन परिणाम झाल्याचे पेढे दुकानदार समाधान बाºहाडे यांनी सांगितले. वर्षभरासाठी लागणारे कांदे-बटाटे, लसुण, मसाले सुकी मच्छी आदी जिन्नसा यात्रेकरु खरेदी करतात.नाशिक, लासणगाव आदि ठिकाणचे व्यापारी कांदे बटाटा लसूण यांची दुकाने मांडतात. सुकी मच्छी खारे (घोळ,सुरमई, दाढा, मुशी) गुजरात राज्यातील संजाण, नारगोल, खतालवाड, उमरंगाव आदी भागातून दुकानदार येतात.
आठ लाख भाविकांचे महालक्ष्मी दर्शन, १५ दिवसांच्या यात्राकाळामध्ये कोट्यवधीची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 1:14 AM