शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
4
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
5
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
6
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
7
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
8
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
10
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
11
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
12
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
13
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
14
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
15
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
16
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
17
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
18
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
19
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
20
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र

डहाणूची महालक्ष्मी माता, लाखो भाविकांचे श्रध्दास्थान

By admin | Published: April 11, 2017 2:05 AM

डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ मुंबई- अहमदाबाद महामार्गावर विवळवेढे येथे श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. ठाणे, पालघर जिल्हयातील भाविकांबरोबर गुजरात मधील भाविक

- शशिकांत ठाकूर, कासा

डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ मुंबई- अहमदाबाद महामार्गावर विवळवेढे येथे श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. ठाणे, पालघर जिल्हयातील भाविकांबरोबर गुजरात मधील भाविक येथे मोठया संख्येने यात्रा काळात दर्शनासाठी येतात. सुरतमधील भाविकांचीही या देवीवर श्रध्दा आहे. ११ एप्रिलपासून देवीची यात्रा सुरू होत असून सतत पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षेची जय्यत तयारी असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमूख यांनी दिली.वर्षभरात या देवीचे बारसी, नवरात्र यात्रा आदि निरनिराळे उत्सव होतात. चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून पंधरा दिवसाची यात्रा भरते हे येथील मुख्य आकर्षण असून यात्रेत ठाणे, पालघर जिल्हयातील ही सर्वात मोठी यात्रा आहे. या यात्रेदरम्यान चैत्र पौर्णिमेला पहिला होम व त्यानंतर अष्टमीला दुसरा होम असतो. देवीवर आदिवासी समाजाबरोबरच कुणबी, मांगेला, गुजराती आदी समाजाचे भाविक देवीला आपली कुलस्वामीनी मानतात. मंदिरात पुजारी हे आदिवासी समाजाचे व सातवी कुटुंबाचे आहेत. ते श्रध्देने देवीची पूजा करतात.महालक्ष्मी मातेच्या अनेक अख्यायीका असून देवी डहाणूला स्थायीक कशी झाली याबाबत असे सांगितले जाते की, कोल्हापूरच्यामहालक्ष्मीला गुजरातमध्ये वास्तव करण्याची इच्छा झाली असता वाटेत विवळवेढे डोंगरादरम्यान जात असतांना विश्रांतीची गरज भासू लागली व विश्रांतीसाठी देवी मुसल्या डोंगराच्या शिखरावर गेली व पुढे देवीस भक्तांची आवश्यकता वाटली. येथील कान्हा ठाकूर नावाच्या व्यक्तीस देवीने स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला व पुजा करण्यास सांगितले. कान्हा ठाकूर मोठया श्रध्देने डोंगरावर जाऊन पूजा करू लागले. आणि पुढे देवी डहाणूला विवळवेढे येथे स्थायिक झाली असे महालक्ष्मी देवीच्या प्रसिध्द पुस्तकात नमूद केले आहे.मध्यरात्री धावत जाऊन रोवला जातो ध्वजचैत्र शुध्द पौर्णिमेला पहिल्या होमाच्या दिवशी मध्यरात्री १२ वा. पुजारी ध्वज, पुजेचे साहित्य, नारळ घेऊन वेगाने पायथ्याच्या मंदिरापासून धावत निघतो व तीन मैलाच्या डोंगरदऱ्याचा रस्ता कापून मध्येरात्री ३ वा. डोेंगरावर चढतो व तेथे तुपाचा दिवा लावून ध्वज फडकावतो. ध्वज लावण्यास जातो त्यावेळी त्याच्या अंगात देवी संचारते असे म्हणतात. हे देवकार्य वाबाडी येथील मोरश्वर सातवी परंपरेने करतात.