पालघर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. विविध समाजघटकांचा विचार करून अर्थमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. शेतकरी, आदिवासी वर्गाचे समाधान करतानाच मंदीत असलेल्या बांधकाम व्यवसायालाही दिलासा देण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केलेला आहे. आरोग्य सेवेच्या बळकटीकरपणासाठीही शासनाने निधीची तरतूद केली आहे. यामुळे ढासळलेली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुदृढ होईल, अशा विश्वासही व्यक्त होत आहे. पालघर जिल्हावासीयांच्या अर्थसंकल्पासंबंधीच्या या बोलक्या प्रतिक्रिया...महाविकास आघाडीच्या सरकारने आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याने आमच्या जिल्ह्यातील काहीशी ढासळलेली आरोग्य यंत्रणा सुदृढ होईल, असा आशावाद निर्माण झाला आहे. साधी एक्सरे मशीन, इंजेक्शन, औषधेही व्यवस्थित पुरवठा होत नसल्याने आता सर्व यंत्रांनी पूर्ण आणि स्त्रीरोगतज्ञ, भूलतज्ञ आदी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवाही गरीब रुग्णांसाठी उपलब्ध होऊ शकते.- टी.एम. नाईक, ज्येष्ठ नागरिक, पालघरआमदार निधीत १ कोटींची वाढ सरकारने केल्याने आता आमच्या हाती ३ कोटींचा विकासनिधी उपलब्ध होणार आहे. आता ग्रामीण भागातील समाजगृहे, रस्ते आदी अधिक सुविधा देण्यात सोयीचे होईल आणि कौशल्य विकासअंतर्गत तरु णांना प्रशिक्षण देण्याचा अजेंडा मी जिल्ह्यात राबवायला सुरुवात केली असून सरकारने हा अजेंडा स्वीकारल्याने मला विशेष आनंद झाला आहे.- आ. राजेश पाटील, बहुजन विकास आघाडी, बोईसर
>या अर्थसंकल्पात शीघ्र गतीने शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली २२ कोटींची कर्जमाफी व नियमितपणे कर्जफेड करणाऱ्यांस ५० हजार, तर घर खरेदीवर १ टक्के स्टॅम्प ड्युटी कमी या जमेच्या बाजू असून एकंदरीत हा अर्थसंकल्प चांगला आहे.- भगिरथ भोईर, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जि. मध्य. सहकारी बँक> सौरऊर्जा प्रकल्प, ठिबक सिंचन या दोन योजना स्वागतार्ह आहेत. मात्र जो सामान्य शेतकरी शेतामध्ये काबाडकष्ट करून रोज शेतात घाम गाळून शासनाचे घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड करतो, त्यांची या अर्थसंकल्पाने घोर निराशा केली आहे.- अनिल पाटील,राज्यस्तरीय कृषिभूषण शेतकरी>राज्याला विकासाकडे घेऊन जाणारा आणि शेतकरी तसेच आदिवासींच्या हिताकडे खास लक्ष देऊन अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. त्यामुळे जनसामान्यांना त्याचा फायदा होणार आहे.- आनंद ठाकूर,आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस>एस.टी.च्या प्रवाशांची गरज ओळखून राज्य सरकारने १६०० नवीन गाड्या खरेदी करण्यासाठी ४०० कोटी रु पयांची या अर्थसंकल्पात तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांचे आभार! या निर्णयामुळे एस.टी. महामंडळाची सेवा प्रवासाभिमुख होण्यास मदत होणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली या गाड्यांच्या ताफ्याचे योग्य नियोजन करून महामंडळाला नफ्यात आणण्यासाठी एस.टी. कर्मचारी मनापासून प्रयत्न करतील आणि पुन्हा एस.टी.ला चांगले दिवस येतील याची खात्री आहे.- कुंदन संखे, प्रमुख सल्लागार, महाराष्ट्र राज्य एस.टी. कामगार सेना