- आशिष राणेवसई : वसईतील शिवसेनेचे उमेदवार विजय पाटील यांनी शुक्रवारी वसई विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वसईतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पालघरचे खा. राजेंद्र गावित, आ. रवींद्र फाटक, तसेच जिल्हा आणि तालुक्यातील शिवसेनेचे आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अर्ज दाखल करण्यापूर्वी विजय पाटील यांनी वसईच्या रणवीर चिमाजी आप्पा मैदानावर शक्तीप्रदर्शन करीत मैदानापासून ते वसई प्रांत कार्यालयापर्यंत मोठी रॅली काढली. या रॅली दरम्यान वसईत सर्वत्र प्रचंड वाहतूक कोंडी झाली.मनसेकडून प्रफुल्ल ठाकूर यांचाही अर्ज दाखलवसई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वसईतही आपला उमेदवार दिला असून शुक्रवारी अखेरच्या दिवशी पश्चिम पट्टीत कार्यरत असलेले प्रफुल्ल ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील तांगडे यांना सुपूर्द केला.यावेळी त्यांच्यासमवेत वसईतील मोजके पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अनंत चतुर्दशी दिवशी काँग्रेसचे विजय पाटील यांनी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेत त्यांच्याकडून शिवबंधन बांधले होते.त्याचवेळी मनसेचे हे आजचे उमेदवार ठाकूर यांनीही काही मिनिटासाठी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र नंतर तेथून थेट निघून याच ठाकूरांनी दुसºया दिवशी पुन्हा मनसेत प्रवेश केला.वसईत दोन अपक्षांचे अर्ज दाखल : वसई : वसईतील लढत चुरशीची होणार आहे, यात अजिबात शंका नाही. अपक्ष म्हणून विरार चंदनसार येथील भावेश चंद्रकांत भोईर व नालासोपारा अचोळे रोड येथील हिंदू जागरण सभेचे अपक्ष उमेदवार सुनील मणी सिंग यांनीही वसई विधानसभा निवडणुकीसाठी आपले अर्ज भरले आहेत.पाटील विरुद्ध पाटील लढत होता होता राहिलीशिवसेनेने विजय पाटील यांना उमेदवारी तर दिली, मात्र जर वसई विधानसभा मतदारसंघात हितेंद्र ठाकूर ऐवजी बहुजन विकास आघाडीकडून राजीव यशवंत पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली असती तर आज वसईतील मतदारांना सेना - बविआ अशा थेट सरळ लढतीचा आनंद घेता आला असता. याउलटही केवळ पक्षांची लढाई न राहता अगदी आडनावांची ही लढत पहावयास मिळाली. म्हणजेच पाटील विरुद्ध पाटील अशी लढत. यामध्ये अर्धे अधिक विजय पाटील कोण आणि राजीव पाटील कोण हे शोधत गोंधळात पडले असते.डहाणूत मनसेतर्फे सुनील इभाड मैदानात : डहाणू/बोर्डी : डहाणू विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सुनील इभाड यांनी शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मनसेचे पालघर जिल्हा सचिव दिनेश गवई, पालघर शहर प्रमुख सुनील राऊत तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नालासोपा-यात ९ अर्ज दाखल : नालासोपारा : नालासोपारा विधानसभा मतदार संघासाठी शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्र वारी ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये प्रवीण गायकवाड (वंचित बहुजन आघाडी), सतीश वारेकर (अपक्ष), सुरेश पांडे (अपक्ष), अनिल पांडे (अपक्ष), मुझफर व्होरा (अपक्ष), सलमान बलोच, धर्मशील खरे, मौसिन शेख (तिघेही बसपा) यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात आपले अर्ज दाखल केले.
Maharashtra Election 2019 : सेनेच्या विजय पाटील यांनी भरला अर्ज, युतीचे कार्यकर्ते, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 12:27 AM