शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरल्लाहच्या मृत्यूचे पडसाद भारतात उमटले; लखनौला शेकडो लोक रस्त्यावर उतरले
2
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
3
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
4
अखेर Ashneer Grover यांनी BharatPe सोबतचा वाद सोडवला, काय झाली दोघांमध्ये डील?
5
Mominul Haque चं शतक; कमी वेळात सामना जिंकून दाखवणं टीम इंडियाला जमेल?
6
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
7
जीवघेणा प्रवास! डोक्यावर उत्तरपत्रिका, हातात चप्पल अन्...; शाळेत जाण्यासाठी शिक्षकाची धडपड
8
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
9
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
10
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
11
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
12
Bajaj Steel Industries Share Price : पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
13
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
14
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
15
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
16
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
17
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
18
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
19
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
20
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!

पालघरमधील ५ विधानसभा मतदारसंघांत डाॅ. हेमंत सावरा सरस, विरोधी पक्षांना महायुतीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 8:44 AM

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result:

- हितेन नाईकपालघर - पालघर लोकसभा मतदारसंघातील डहाणू विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य पाच विधानसभा क्षेत्रांत डॉ. हेमंत सवरा यांनी दोन्ही उमेदवारांना डोके वर काढायची संधीच दिली नाही.

‘मविआ’च्या भारती कामडींपेक्षा १ लाख ८४ हजार २६८ मते आणि ‘बविआ’च्या राजेश पाटील यांच्यापेक्षा ३ लाख ४६ हजार १९७ मते जास्त घेत येत्या विधानसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षांना महायुतीने इशारा दिला आहे. मागील २०-२५ वर्षांपासून बविआची एकहाती ताकद हितेंद्र ठाकूर यांनी वेळोवेळी दाखवून दिली आहे.

बोईसर विधानसभेवर बविआचे वर्चस्व असून, लोकसभा लढलेले उमेदवार राजेश पाटील हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी (७८,७०३ मते) शिवसेनेचे उमेदवार विलास तरे (७५,९५१ मते) यांचा पराभव केला होता. सध्या विलास तरे सेनेतून भाजपमध्ये आल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप, बविआ आणि उद्धव सेना अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता  राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. 

 पालघर  विधानसभा हा मूळ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी लोकसभेत भारती कामडी (६४,३५२ मते) यांच्यापेक्षा डॉ. सवरांना मिळालेली अधिक २९,२३९ मते (एकूण मते ९३,५९१) पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत मविआच्या उमेदवाराला धोक्याची घंटा ठरू शकते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आ. श्रीनिवास वनगा (६८,०४० मते) यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला होता. 

- नालासोपारा  विधानसभा क्षेत्रात आ. क्षितिज ठाकूर (१,४९,८६८) यांनी शिवसेनेचे प्रदीप शर्मा (१,०६,१३९) यांचा पराभव केला होता. या अभेद्य गडाला सुरुंग लावण्याचे काम डॉ. सवरा यांनी केले आहे. बविआ उमेदवारापेक्षा ५७,३५८ मते खेचून आणण्यात यश मिळाले आहे. - वसई विधानसभेत बविआचे सर्वेसर्वा आ. हितेंद्र ठाकूर यांनी २०१९ निवडणुकीत (१,०२,९५०) शिवसेनेचे विजय पाटील (७६,९५५) यांचा पराभव केला होता. -  या लोकसभेत महायुतीचे डॉ. सवरा यांनी त्यांच्या वर्चस्वाला छेद देत राजेश पाटील यांच्यापेक्षा २५,४३९ अधिक मते मिळवत ठाकूर यांना पुढील निवडणुकीसाठी इशारा दिला आहे. 

 डहाणू  विधानसभा मतदारसंघात भाजपचे पास्कल धनारे हे २०१४ मध्ये आमदार होते. २०१९ च्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले (७२,११४ मते) यांनी भाजपचे पास्कल धनारे (६७,४०७) यांचा पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीत डॉ. सवरा (८३,०००) यांच्यापेक्षा मविआ उमेदवार भारती कामडी (८३,८८२) यांनी केवळ ८८२ मतांची आघाडी घेतली. विक्रमगड विधानसभेत शरद पवार गटाचे सुनील भुसारा (८८,४२५) यांनी विद्यमान खासदार डॉ. सवरा (६७,०२६) यांचा पराभव केला होता. आ. भुसारा हे  मविआमध्ये असले, तरी विद्यमान आमदारांच्या कार्यक्षेत्रात भारती कामडी यांना डॉ. सवरांपेक्षा ३३,२०९ मतांचा फटका बसला.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालpalghar-pcपालघरBJPभाजपा