नालासोपारा : नालासोपारा मतदारसंघात प्रदीप शर्मा यांना उतरवून क्षितीज ठाकूर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करणाºया शिवसेनेला शह देत बहुजन विकास आघाडीने या मतदारसंघांतील उमेदवारांची अदलाबदल करण्याची खेळी सुरू केल्याचे समजते. वसईऐवजी नालासोपाºयातून हितेंद्र ठाकूर यांना उतरवायचे आणि तुलनेने सोप्या वसई मतदारसंघात क्षितीज यांना उभे करण्याच्या हालचाली त्या पक्षात सुरू असल्याचे सांगण्यात येते.एकीकडे शिवसेनेने प्रदीप शर्मा यांना रिंगणात उतरवून हा वसई-विरारमधील गुंडगिरीविरोधात लढा असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र भाजपला विश्वासात न घेता शिवसेनेने परस्पर शर्मा यांची दावेदारी दाखल केल्याने भाजपच्या एका गटात अस्वस्थता पसरली आहे.वसई परिसरावर गेली तीन दशके बहुजन विकास आघाडीची- पर्यायाने ठाकूर कुटुंबीयांची सत्ता आहे. हितेंद्र यांच्यापाठोपाठ क्षितीज यांना पक्षाने राजकारणात उतरवले. गेल्या दोन विधानसभांत ते निवडून येत आहेत. सध्या वसई, नालासोपारा, बोईसर या तीन मतदारसंघांत बविआची सत्ता आहे. बोईसर मतदारसंघांतील विद्यमान आमदार विलास तरे यांना शिवसेनेने फोडले. त्यानंतर नालासोपाºयात कोंडीचे प्रयत्न सुरू केले. त्याला उत्तर देण्यासाठी आ. हितेंद्र ठाकूर स्वत: नालासोपाºयातून लढणार असल्याचे सांगण्यात येते. तसे झाले, तर येथील लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे.भाजपमध्ये नाराजीनालासोपाºयातून शिवसेनेने माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची उमेदवारी परस्पर जाहीर केल्याने उमेदवारीसाठी तयारी केलेल्या भाजपच्या एका गटात अस्वस्थता पसरली आहे. युतीची घोषणा होण्यापूर्वी शिवसेनेने परस्पर उमेदवार जाहीर करून प्रचारही सुरू केल्याला या गटाने आक्षेप घेत आपली नाराजी जाहीरपणे मांडली आहे. नालासोपारा मतदारसंघ शिवसेनेला दिला गेला, तर भाजपच्या अस्तित्वालाच नख लागेल, असा या गटाचा दावा आहे. शिवसेनेने आम्हाला विश्वासात का घेतले नाही, अशी विचारणाही या नेत्यांनी केली आहे. याबद्दल चर्चा करण्यासाठी एका बैठकही घेण्यात आली. त्याचवेळी भाजपच्या दुसºया गटाने पूर्वेकडील आचोळे रोडवर प्रदीप शर्मा यांचा सत्कार केल्याने गटबाजीला तोंड फुटले आहे.शिवसेना आणि भाजपच्या युतीची घोषणा होण्याआधीच वसई तालुक्यातील नालासोपारा आणि वसई विधानसभेवरून वातावरण तापण्यास सुरु वात झाली आहे. नालासोपाºयात भाजपतर्फे राजन नाईक यांना उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. पण शिवसेनेने उमेदवार जाहीर केल्याने भाजपमधील नाईक गट नाराज झाला आहे. भाजप वाढीसाठी प्रयत्न केल्यानंतर आयत्यावेळी ही जागा शिवसेनेला दिली तर भाजपाच्या अस्तित्वाचे काय? असा प्रश्न करूना शिवसेनेने आम्हाला विश्वासात घेतले नाही, असा गंभीर आरोप त्यांच्या गटाने केला आहे. याबाबत राजन नाईक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.शिवसेनेचे पदाधिकारी प्रवीण म्हाप्रळकर यांनी सांगितले, अजून युती झालेली नाही. त्याची निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. तोवर वरिष्ठ नेत्यांनी संभाव्य उमेदवार प्रदीप शर्मा असल्याचे आदेश दिल्याने आम्ही काम करीत आहोत. त्याचवेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुभाष साटम यांनी आचोळे रोडवर प्रदीप शर्मा यांचा सत्कार केला. त्यामुळे भाजपच्या दुसºया गटाने साटम यांच्या कार्यालयावर जाऊन पक्षविरोधी कामे करू नका, असे सांगण्याचा प्रयत्न केला. अजून युती झालेली नसताना शिवसेनेच्या संभाव्य उमेदवाराचे स्वागत का केले, असे प्रश्नही कार्यकर्त्यांनी विचारले.आमचा प्रदीप शर्मा यांच्या उमेदवारीला विरोध नाही. पण शिवसेनेने आम्हाला विश्वासात घेऊन सांगितले असते, तर त्यांचे स्वागत केले असते. नालासोपारा शहरात भाजपची ताकद वाढवण्यासाठी गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता प्रयत्न करतो आहे. ही जागा शिवसेनेला दिली गेली तर भाजपच्या अस्तित्वाचे काय?- मनोज बारोट (पदाधिकारी, नालासोपारा भाजप)
Vidhan Sabha 2019: नालासोपाऱ्यात हितेंद्र ठाकूर, तर वसईतून क्षितिज ठाकूर?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 11:59 PM