शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

वसईतील 16 गावांमध्ये महिलाराज, तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 1:48 AM

Sarpanch : वसई तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून गावाचा कारभार कोण सांभाळणार, हे आता उघड झाले आहे.

- सुनील घरतपारोळ : वसई तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून गावाचा कारभार कोण सांभाळणार, हे आता उघड झाले आहे. वसई तहसीलदार उज्ज्वला भगत यांनी तहसीलदार कार्यालयात वसईतील ३१ ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण सोडत जाहीर केली असून यामध्ये १६ गावचा कारभार महिला पाहणार आहेत, तर १५ गावच्या सरपंचांची धुरा पुरुष सांभाळणार आहेत. तालुक्यात या वर्षीची पहिली ग्रामपंचायत निवडणूक सत्पाळा व पाली या दोन गावांत झाली. या गावांत सरपंचपदासाठी कोणते आरक्षण पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सत्पाळा ही ग्रामपंचायत अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली असून पालीमध्ये सर्वसाधारण पुरुष गावचा कारभार पाहणार आहे.तालुक्यात या वर्षी जूनमध्ये काही ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्यामुळे काही महिन्यात या गावात निवडणुका होण्याची शक्यता आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक या वर्षी जानेवारीमध्ये घेण्यात आली, तर कोरोनाचा कहर कमी झाल्याने पुढे येणाऱ्या निवडणुका या वेळेत होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या वर्षी भरउन्हाळ्यात गावांतील राजकीय वातावरण तापणार आहे. दरम्यान, नोव्हेंबरमध्येसुद्धा ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले होते, पण निवडणुकीच्या आधी आरक्षण जाहीर झाल्यास निवडणुकीत सरपंचपदासाठी घोडेबाजार होईल म्हणून सरकारने आरक्षण रद्द केले होते. आताही पुढे निवडणूक होणाऱ्या गावांचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने येणाऱ्या निवडणुकीतही या आरक्षणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.सत्पाळा अनुसूचित महिला, तर पालीत पुरुष सरपंचनुकत्याच निवडणुका पार पडलेल्या दोन ग्रामपंचायतींपैकी सत्पाळा ग्रामपंचायत अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाली आहे. यामुळे निवडून आलेल्या अनुसूचित जमातीच्या महिलांपैकी सरपंचपदाची लाॅटरी कुणाला लागते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. तर पाली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणात सर्वसाधारण पुरुषांना आरक्षण पडले आहे. त्यामुळे निवडून आलेल्या पुरुष उमेदवारांपैकी कोण गावचा कारभारी होतो, याकडे लक्ष लागले आहे. अनुसूचित जमातीसाठीचे आरक्षण३१ पैकी १९ ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्या असून या गटातील महिलांसाठी मेढे, माजिवली-देपिवली, आडणे-भिनार, पारोळ, करंजोण, नागले, शिवणसई, उसगाव, सायवन या गावांचा, तर अनुसूचित पुरुषांसाठी सकवार, टिवरी, चंद्रपाडा, टोकरे, मालजीपाडा, तिल्हेर, पोमण, शिरवली आणि खानिवडे, भाताणे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ८ ग्रामपंचायती सर्वसाधारण वर्गासाठी राखीवअन्य १२ ग्रामपंचायतीत सत्पाळा अनु. जमाती महिलांसाठी राखीव, अर्नाळा गाव नागरिकांच्या मागास प्रवर्ग पुरुषांसाठी, तरखड, पाणजू ग्रा.प. महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. इतर ८ ग्रा.पं. या सर्वसाधारण वर्गासाठी राखीव कळंभ, खोचिवडे, अर्नाळा किल्ला व रानगाव, सर्वसाधारण महिलांसाठी वासळई, पाली, टेंभी,खार्डी-डोलीव सर्वसाधारण पुरुषांसाठी राखीव झाल्या आहेत. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचVasai Virarवसई विरार