बोईसर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा आज आॅनलाइन जाहीर झालेल्या निकालामध्ये बोईसर व परिसरातील बहुसंख्य शाळांमध्ये विध्यार्थीनी चांगले गुण मिळवून अव्वल स्थानी आल्या आहेत., एम आय डि सि तील तारापूर विद्या मंदिर शाळेचा निकाल 99.22 टक्के लागला असून 91.20 टक्के गुण मिळवून अन्सारी मोहम्मद झैद नाविद उलहक प्रथम 90.40 टक्के गुण मिळवून सचित तरे द्वितीय तर 90.20 टक्के गुण मिळवून स्वराज पाटील व कृपा ठाकूर हे तृतीय आले आहेत, डॉन बॉस्को स्कूल (बोईसर) शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून 94.60 टक्के गूण मिळून इनामदार सैफानजुम मोहिनुद्दीन प्रथम तर श्रेणी राऊत 94.40 टक्के द्वितीय, विधी जैन 93.40 टक्के तृतीय आली आहे, बोईसर मिलिट्री स्कूल, पास्थळनाका, बोईसर (मराठी माध्यम) शाळेचा निकाल 98.93 टक्के लागला असून सुमेधा सावंत 88.80 टक्के गुण मिळवून प्रथम माधवी सावंत 87.40 टक्के द्वितीय तर विशाखा साळुंखे 86.60 टक्के तृतीय आली आहे., ज्योतिदीप हिंदी विद्यालय , पास्थळनाका, बोईसर (हिंदी माध्यम ) शाळेचा निकाल 80.76 टक्के लागला असून सालवी तिवारी ही विद्यार्थीनी 88.80त्न गुण मिळवून प्रथम आली असून संदीप सिंग 87.40 टक्के द्वितीय तर राणी सिंग 80.00 टक्के तृतीय आली आहे.बोईसर मिलिट्री स्कूल अँड ज्यू. कॉलेज पास्थळ नाका , बोईसर (इंग्लिश माध्यम) शाळेचा निकाल 81.48 टक्के लागला असून रोहन जंगले 84त्न प्रथम निकिता बिस्वास 82.80% द्वितीय तर विक्र ांत तिवारी 80.20% गुण घेऊन तृतीय आला.नावझें शाळेचा निकाल 98.3 टक्केग्रामीण विद्यालय नावझें शाळेचा निकाल 98.3 टक्के लागला असून प्रथम मंथन पाटील 89.40 टक्के द्वितीय हर्षद जाधव 81.80 टक्के तर 81. 60 टक्के गुण मिळवून निशांत पाटील हा तृतीय आला आहे, स्व. सौ. विद्या विनोद अधिकारी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (लालोंडे) या शाळेत रिद्धी पाटील 89.60 टक्के गुण मिळवून प्रथम वैभव अधिकारी, 88.00 टक्के द्वितीय तर मानसी पाटील व गिरीश पाटील हे 87.00 टक्के गुण मिळवून तृतीय आले आहेत.
बोईसरच्या बहुसंख्य शाळांमध्ये विद्यार्थीनी अग्रस्थानावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 11:47 PM