- हितेन नाईक पालघर : जिल्ह्यात दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या माकूणसारच्या दुधाची स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी ‘माकूणसार ब्रँड’ निर्मितीसाठी सर्व दूध उत्पादक संघटित झाले असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.शुक्र वारी सफाळ्याच्या देवभूमी हॉल मध्ये दुधउत्पादकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.माकूणसार हे शेतकरी, बागायतदारांचे गाव दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. उत्पादकांना दूध मुंबईत नेता यावे यासाठी ३० वर्षाआधी पासून पहाटे सफाळ्याला थांबणाºया रेल्वेला एक स्वतंत्र बोगी जोडण्यात आली होती. ‘दूधवाला डब्बा’ म्हणून तो सर्वत्र परिचित होता. हे दूध विरार ,मुंबई येथे वितरित केले जात होते. जिल्हातील दूध उत्पादक संघांनी त्याला पाठिंबा दर्शविला. मात्र त्याला रास्त भाव मिळत नसल्याने त्यांनी एकत्र येऊन स्वतंत्र ब्रँडिंग करण्याचे स्वप्न सफळ्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण राऊत ह्यांनी पाहिले. त्यासाठी शेकडो दूध उत्पादक २३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाले होते.या गावात लहान मोठे ६५ दूध उत्पादक शेतकरी असून सुमारे १८ ते २० हजार लिटर दुधाचे दररोज उत्पादन होते. यापैकी अधिकतर दूध सध्या एका सहकारी संघाला देऊन उर्वरित दूध वसई तालुका व मुंबईच्या उपनगरात आजही वितरित करण्यात येते. या उत्पादकांनी पालघर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून अद्ययावत दूध कंपनी स्थापन करण्याची इच्छा जिल्हाधिकाºयां कडे व्यक्त केली होती. प्रवीण राऊत, माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, चिंतामण ठाकूर, नागेश पाटील, विशाल वर्तक यांनी त्यांची भेट घेऊन ठोस पावले उचलण्याबाबत चर्चा केली होती.या ब्रँडची उभारणी करण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट अंतर्गत आवश्यक नोंदणी करून तबेल्यांच्या पाहणीसाठी यांची पशु वैद्यकीय अधिकाºयांचा दौरा आयोजित करणे, दुधाचे उत्पादन वाढण्यासाठी संबंधित अधिकाºयांनी मार्गदर्शन करणे, या भागातील शेतकºयांचा संगमनेर, श्रीरामपूर, नाशिक आदी भागातील मोठ्या आणि मध्यम स्वरूपाच्या डेअरींचा पाहणी दौरा आयोजित करून दूध संकलन ते प्रक्रि या- विक्र ी यांची माहिती द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली होती.जिल्हाधिकाºयांनी त्यांच्यासाठी दुग्ध व्यवसाय : आव्हाने आणि संधी या कार्यक्र माचे आयोजन उद्या (शुक्र वारी) सफाळ्याच्या देवभूमी हॉल मध्ये सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्र मात दूध प्रक्रि येवर प्रभात डेअरीचे सारंग पुरनाळे, सेंद्रियशेती प्रमाणीकरण, सेंद्रिय दूध उत्पादन वर डॉ. प्रशांत नाईकवाडी, पंचगव्य व गांडूळखत वर विशेषज्ञ उत्तम सहाणे, डॉ.किशोर बोकील आदी मार्गदर्शन करणार आहेत.
पालघरमधून उदयास येणार माकुणसार ए-२ जैविक दूध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 2:11 AM