शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
2
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
3
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
4
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
5
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
6
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
7
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
8
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
9
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
10
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
11
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
12
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
13
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
14
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
15
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
16
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
17
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
18
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
19
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
20
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?

दुचाकी चोरणाऱ्याला माणिकपूर पोलिसांनी केली अटक, दोन गुन्ह्यांची उकल करून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 3:55 PM

माणिकपूरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी दहिसर येथून दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला पकडण्यात यश मिळाले आहे.

मंगेश कराळेनालासोपारा:- माणिकपूरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी दहिसर येथून दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला पकडण्यात यश मिळाले आहे. पोलिसांनी २ गुन्ह्यांची उकल करून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

नायगावच्या उमेळे येथे गार्नेट अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या निहाल घरत (३१) यांनी नायगाव पश्चिम रेल्वे ब्रिजच्या बाजूला मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास पार्क करून ठेवलेली ९० हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक दुचाकी चोरट्यांनी चोरी करून पळवून नेली होती. माणिकपूर पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने वरिष्ठांचे मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप व पोलीस अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारामार्फत आरोपी चंद्रेश गणेशप्रसाद पाठक (२३) याला दहिसर येथे सापळा कारवाई करुन ताब्यात घेतले. त्याने दुचाकी चोरीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याला अटक केली आहे. अटक आरोपीकडून दुचाकी चोरल्याचे सांगितले. आरोपीकडून ३ लाख ९० हजार रुपये किंमतीच्या ५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. माणिकपुर पोलीस ठाण्यातील २ गुन्हे उघड केले असून इतर ३ गुन्हयांचा तपास चालु आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांचे मार्गदर्शनाखाली माणिकपुरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील, गुन्हे प्रकटीकरणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, सचिन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक तडवी, तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार चौधरी, पाटील, चंदशिवे, चव्हाण, कानडे यांनी केली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार