मनोर : या ग्रामपंचायत परिसरातील घन कचरा वैतरणा नदीच्या पात्रात टाकला जात असल्याने पाण्यातील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आले असून दर दिवस तीन ते चार टन कचरा जमा होतो मनोर ग्रामपंचायतीला डंम्पिंग ग्राऊंड नसल्याने नदीचे पात्रच डम्पिंग ग्राऊंड करण्यात आले आहे.हा परिसर भला मोठा असून नागरीकरण झपाट्याने वाढते आहे मात्र सर्व ठिकाणचा कुजलेला, व कुंड्या तील तीन ते चार टन कचरा तीन घंटा गाडयांद्वारे नदी च्या काठावर टाकण्यात येतो त्याच ठिकाणी वैतरणा नदीचा संगम झाला आहे हा सर्व घनकचरा त्या दोन्ही नद्यांच्या पात्रात पडून मिसळत आहे त्यामुळे पाण्यातील जलचरांवर विपरीत परिणाम होत असून त्यांचे जीवन उध्वस्त होत आहे. तरी एकही अधिकारी तसेच मतांसाठी हपापलेले नेते, पुढारी मनोर च्या या प्रकाराबाबत कोणतीही दखल घेत नाहीत.मनोर ग्रामपंचायतीचे सरपंच कैफ रईस म्हणाले की घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डंम्पिंग ग्राऊंड करीता जमीन मिळावी असा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.साध्य जागा नसल्याने नाईलाज झाले आहे म्हणून नदीच्या काठी कचरा टाकला जातो.
मनोरचे डम्पिंग ग्राउंड गेले वैैतरणेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:35 PM