शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

काँग्रेस पदाधिकाऱ्याविरुद्ध मनोरला अपहरणाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 5:25 AM

रस्त्याच्या विद्रुपीकरणास विरोध नडला

वसई : सार्वजनिक ठिकाणी बॅनर, पोस्टरबाजी करून रस्त्यांचे विद्रुपीकरण करण्याºया भाजप कार्यकर्त्यांना रोखणाºया वसईतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी मारहाण आणि अपहरणाचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे,त्यातच काँग्रेस पक्ष कार्यकर्ते कायद्याच्या कचाट्यात सापडले असताना त्यांच्या मदतीला काँग्रेस पक्षाऐवजी चक्क बहुजन विकास आघाडीचे विरार व पालघर मधील नेते मंडळी धावून गेल्याची माहिती मिळते आहे. युवक काँग्रेसचे कुलदीप वर्तक आणि त्यांचे सहकारी संजय मिश्रा, सुनील कोवाल, प्रतीक वर्तक यांच्यासह जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यासाठी येथे आले होते.

रात्री ८ वाजता वर्तक हे सफाळे -पारगाव -वरई महामार्गाने वसईकडे येत असतांना काही मुले भाजपाची निशाणी असलेल्या कमळाची चित्रे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या कठड्यावर लावत असल्याचे आढळले. त्यावेळी वर्तक आणि त्यांच्या सहकाºयांनी याबाबत मुलांना हटकले असता भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक चित्र चिकटवण्यासाठी दहा रुपये दराने आपणास हे काम दिल्याचे सांगितले, परिणामी वर्तक यांनी तत्काळ पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना मोबाइल वरून ही गंभीर बाब कथन केली. त्यानंतर वर्तक यांनी या मुलांना नजीकच्या मनोर पोलीस ठाण्यात नेले मात्र याच मुलांनी त्यांच्या मोबाईलवरून पालघर भाजपच्या कार्यकर्त्यांना माहिती दिल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनोर पोलीस ठाण्यात जमून दबाव आणला आणि समस्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या मुलांना जबरदस्तीने पळवले असून त्यांना मारहाण केल्याचा खोटा गुन्हा त्यांच्या विरोधात नोंदविला. या प्रकरणी आपण वरिष्ठस्तरावर दाद मागणार असल्याचेही वर्तक यांनी सांगितले.पक्ष कार्यकर्ते अडचणीत असताना पालघरमधील काँग्रेसचा कोणताही वरिष्ठ नेता साधा फिरकला नाही अथवा मदतीला धावून आला नाही मात्र बहुजन विकास आघाडीचे वरिष्ठ नेते मात्र मदतीला धावून आल्याची जोरदार वदंता पालघर जिल्ह्यात सुरु आहे, त्यामुळे पुढील काळात राजकारणाची समीकरणे बदलणार कि काय असेच चित्र दिसते आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार