- हितेन नाईकपालघर - खरीप पीक कर्ज वाटपात जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयकृत बँकाना दिलेले लक्ष्यांंक (टार्गेट) पूर्ण करण्यात अनेक बँका अयशस्वी ठरल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे. कर्ज वाटपात उदासीन धोरण स्वीकारणाऱ्या बँकांना अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर ह्यांनी बँकांना दिलेल्या धक्का तंत्राची अंमलबजावणी आमचे जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे करतील काय? असा प्रश्न कर्जा पासून वंचित असलेले शेतकरी विचारीत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी सर्व सेवा अभियानांतर्गत कुठलाही जामीनदार न घेता शेतकºयांना कर्जवाटप करण्याचे आदेश दिले होते. मात्र राष्ट्रीयकृत बँका शासनाच्या कुठल्याही आदेशाला न जुमानता आरबीआय ने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास आम्ही बांधील असल्याचे त्यांच्या कर्जवाटपावरून दिसते आहे. दिवंगत खासदार चिंतामण वणगां हे देखील मुद्रा बँकांतील कर्ज वाटपातील दिरंगाईचे बळी ठरले होते. शासकीय खात्यातील जामीनदार आणल्याशिवाय आम्ही कर्ज देणार नसल्याचे बँक अधिकारी आपल्याला सांगत असल्याचे ते व्यासपीठावरून अनेक वेळा बोलले होते.केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या सरकारच्या खासदाराची ससेहोलपट राष्ट्रीयकृत बँकानीच केल्याने त्या बँकांच्या अधिकाºयांची मस्ती वाढली होती. त्यामुळेच पीककर्ज वाटपाच्या टक्केवारीत सतत घसरण होतेआहे.आतापर्यंत फक्त १० टक्के कर्जाचे केले आहे वाटपजिल्हाधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेच्या नेतृत्वाखाली विविध बँकांच्या अधिकाºयांच्या जिल्हा आर्थिक समितीद्वारे जिल्ह्यातील बँकांना खरीप कर्ज, उद्योग उभारणाºया बेरोजगार, व्यावसायिक आदींना कर्ज वाटपाचा लक्षांक दिला जातो.जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांना देण्यात आलेल्या ४६.०९ कोटी लक्ष्यांकांपैकी आजवर फक्त ९ कोटी ४८ लाख रुपयाचे कर्ज त्यांनी वाटप केले आहे.याउलट सहकारी बँकांची याबाबतची कामिगरी समाधानकारक म्हणावी लागेल.राष्ट्रीयकृत बँकांची कर्ज वाटपा बाबतची उदासीनता पाहता मी आमच्या विविध विभागांची ७ खाती एसबीआय बँकेतून बंद करून ती युनियन बँकेत सुरू केली.त्यामुळे कमिर्शयल बँकांतील कर्ज वाटपाचे प्रमाण ३ टक्के वरून २७ टक्केवर आले आहे.-अभिजित बांगर,जिल्हाधिकारी, अमरावतीशेतकºयांना कर्ज वाटप करण्याबाबत आमची बँक अग्रेसर असून ९० कोटी वाटपपैकी आम्ही ४५ टक्के लक्ष्यांक पूर्ण केला आहे. अनेक मेळावे घेऊन आम्ही पात्र शेतकºयांना पत्र पाठवून कर्ज मंजूर झाल्याचे कळवितो.- राजेंद्र पाटील,अध्यक्ष.टीडीसी बँक.